नांदेड| भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयातील भ्रष्ट कामकाजाचे निवारण करण्यासाठी मंगळवार 28 जुन 2022 रोजी सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात लेखी निवेदने / तक्रारी सादर करता येतील.
इच्छुक नागरिकांनी आपली निवेदने अध्यक्ष, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती समोर लेखी स्वरूपात सादर करावीत. तसेच आपल्याकडे काही सबळ पुरावे असल्यास त्याच्या दोन प्रती सोबत असणे आवश्यक आहे. या बैठकीला शासनाचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहणार असल्यामुळे आपल्या निवेदनाची तातडीने दखल घेण्यात येईल व नियमानुसार भ्रष्टाचार करणाऱ्यास अथवा भ्रष्टाचारास वाव देणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या विरूद्ध कार्यवाही करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले आहे.