‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत उन्हाळी-२०२२ परीक्षा प्रचलित प्रश्नपत्रिकेद्वारे घेण्यात येणार -NNL


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत उन्हाळी-२०२२ च्या पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा मंगळवार दि.२८ जून पासून सुरू होणार आहेत. या परीक्षा प्रचलित पेन अँड पेपर पद्धतीने दीर्घोत्तरी प्रश्नाद्वारे घेण्यात येणार आहेत.

दि.२० जून रोजीच्या पत्राप्रमाणे सर्व संबंधित महाविद्यालय व परीक्षा केंद्रप्रमुख यांना कळविण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने २८ जून पासून सुरु होणाऱ्या पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा यापूर्वी ठरलेल्या वेळापत्रकानुसार पेन अँड पेपर पद्धतीने दीर्घोत्तरी प्रश्नाद्वारे घेण्यात येणार आहेत. यामध्ये कोणताही बदल होणार नाही. ही बाब संबंधित विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यारी यांच्या प्राचार्यांनी निर्दशनास आणून द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी