लोहा| दहावी बारावी मध्ये शेकडा गुण अधिक मिळावेत यासाठी मोठी स्पर्धा सुरू आहे त्यांनंतर आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे यासाठी प्रचंड ओढाताण सुरू आहे पण यातील सर्वच जण यात यशस्वी होत नाही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते.पण उपयोजनात्मक शिक्षण हे विद्यार्थ्यांना जगण्यासाठी उपयोगी पडू शकते असा शिक्षणाची गरज आहे असे मार्गदर्शन इंग्रजीचे तज्ज्ञ शिक्षक प्रा शंतनू कैलासे यांनी केले.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रँच अंतर्गत जय महाराष्ट्र प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित शिक्षकांना प्रा शंतनू कैलासे यांनी मार्गदर्शन केले यावेळी केंद्र प्रमुख एन एस कसबे, मुख्याध्यापक शिवधन राठोड,मुख्याध्यापिका श्रीमती कुंटे, , जय महाराष्ट्र शाळेचे मुख्याध्यापक संतोष भालेराव, माजी चेअरमन ज्ञानोबा घोडके, दिलीप कहालेकर, रावण वाघमारे , दिलीप सोनवळे, यासह केंद्र अंतर्गत मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
इंग्रजीचे तज्ज्ञ प्रा.शंतनू कैलासे यांनी सध्याची शिक्षण व्यवस्था आणि हॉंगकाँग व अन्य देशातील शिक्षण व्यवस्था यांची तुलनात्मक विवेचन अतिशय प्रभावीपणे त्यांनी केली. दरवर्षी प्रा शंतनू हे वेगवेगवेगळ्या देशात स्वतः जातात. आणि तेथील शाळांची पाहणी करतात तेथील शिक्षकांची ते संवाद साधतात व तेथील शिक्षणाची पद्धती आपल्या शाळेत वापरतात याचे सोदाहरण देताना कोणती शिकविण्याची पद्धती योग्य आहे हे अनेक उदाहरणे देऊन त्यांनी सांगितले.
विद्यार्थी आपल्या जीवनात जगताना शिक्षणाचा फायदा त्याच्या जीवनात झाला पाहिजे तसेच शिक्षणाच्या उपयुक्त व प्रभावी टिचिंग पद्धती कोणती आहे. त्याचा उपयोग कसा करायचा याची प्रभावीपणे मांडणी प्रा.शंतनू कैलासे यांनी केली. यावेळी सुलभक शिक्षक म्हणून एस एन केंद्र, चंद्रकांत वाडकर, बा पू गायखर, सौ प्रिया पारसेवार यांनी मार्गदर्शन केले .आरंभी शाळेचे मुख्याध्यापक संतोष भालेराव यांनी मान्यवरांचा सत्कार केला. संचनल गायखर यांनी केले .जय महाराष्ट्र प्राथमिक शाळेत शिक्षक एस एम कवठेकर, एन एन वाघमारे, एस एस कुलकर्णी, आर आर पारेकर, एस एम राठोड, सौ जे डी,चोले, बालिका आडगावकर, याची उपस्थिती होती.