जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भव्य प्रतिसाद -NNL


नांदेड|
ऑलम्पिक आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून दिनांक २३ जून ते २९ जून २०२२ या कालावधीत नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड ऑलम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा तालुका क्रीडा संकुल सिडको येथे दिनांक २६ जून २०२२ रोजी थाटात उद्घाटन पार पडले.

सदर स्पर्धेत संपूर्ण नांदेड मधून कुमिते या प्रकारात १२८ तर काता या प्रकारात ८० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. तर उद्घाटन प्रसंगी माझी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अनंत बोबडे नांदेड ऑलम्पिक असोसिएशनचे कोषाध्यक्ष श्री जयपाल रेड्डी सदस्य श्री बाबुराव खंदारे भन्तेजी राहुल पवळे गजानन गिरडे बालाजी उदाने उपस्थित होते. तसेच उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी कोरोना नंतर खेळाडूंना नांदेड ऑलम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून शालेय स्तरावर उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी पूर्व स्पर्धा म्हणून मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

येणाऱ्या आगामी शालेय स्पर्धेत खेळाडूंना नक्की फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. तर ओलंपिक असोसिएशन कोषाध्यक्ष श्री जयपाल रेड्डी यांनी जिल्ह्यातील एकविधी क्रीडा संघटना यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. जिल्हा संघटनेचे अध्यक्षा अनुराधा शिंदे सचिव एकनाथ पाटील तसेच नितीन देडे विशाल गायकवाड उत्तम सोनकांबळे जगदीप वाघमारे स्नेहल जाधव, विष्णु जाधव, अंकुश श्रीरामे मनोज पतंगे, लखन तुरेवाड़, मोरे शिवहर यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. 

डॉ. सुनील लहाने आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार श्री रमेश पारे, अध्यक्ष ऑलम्पिक असोसिएशन नांदेड श्री जे ई गोपीले, अवतारसिंग रामगडिया स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे, श्री बालाजी जोगदंड, विक्रांत खेडकर, डॉ. दिनकर हंबर्डे, डॉ. रमेश नांदेडकर, डॉ. राहुल वाघमारे, वृषाली जोगदंड, प्रणिता रेड्डी, शिवकांता देशमुख, राजुरी स्टील व्यवस्थापक श्री विशाल मुधोळकर, शुभम करोति फाउंडेशन व देसाई फाउंडेशनचे किरण चौधरी यांनी २९ जून रोजी स्पर्धेत सहभागी व प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात याठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी