पुलाची उंची वाढऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, पुलाच्या पाईपमधील कचरा काढावा
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मंगरूळ, वारंगतकाळी गावाकडे जाणाऱ्या मुख्यमंत्री सडक रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलामुळे अल्प प्रमाणात पाऊस झाला तरी पुलावरून पाणी जाते आहे. परिणामी पुढील गावांना जाणारा रस्ता तासनतास बंद पडत असून, या ठिकाणचे पाणी परिसरातील शेती पिकात जाऊन नुकसान होते आहे.
हिमायतनगर तालुक्यातील किनवट- नांदेड राष्ट्रीय महामार्गापासून वारंगटाकळी पर्यंत मुख्यमंत्री सडक रस्त्याचे काम मागील ३ वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारने मनमानी पद्धतीने आणि निकृष्ठ दर्जाचे काम केल्याने आजघडली रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. एव्हडेच नाही तर यांचा रस्त्यावर असलेल्या पुलाचे कामातही हलगर्जीपणा करत जुन्याच पुलावर स्लॅब टाकून, जुने आणि तुटले फुटलेले पाईप वापरून काम उरकून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे.
याबाबत मंगरूळ येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार व गावकर्यांनी या निकृष्ट कामाच्या विरोधात आवाज उठविला होता. मात्र ठेकेदाराने सुधारणा करण्याचे आश्वासन देऊन पुन्हा मनमानी पद्दह्तीनेचे पुलाची उंची न वाढविताच काम उरकून घेतली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षपासून पाऊस पडताच येथील पुलाची उंची कमी असल्याने पुराचे पाणी थेट पुलावरून वाहून मंगरूळ, वारंगटाकळी गावाकडे जाणारा मार्ग बंद पाडण्याचे प्रकार घडत आहेत.
शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने या गावाकडे जाणारा मार्ग तब्बल ३ तास बंद झाला होता पूर ओसरल्यानंतर रस्ता सुरु झाला असला तरी येथील पुलंच्या पाईपमध्ये केरकचरा येऊन अडकल्याने आगामी काळात पाऊस झाला कि वारंवार या पुलावरून पाणी जाऊन मार्ग बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पुलाच्या ठिकाणी अडकलेला कचरा करून पाण्याची वाट मोकळी करून द्यावी आणि येथील मार्ग बंद होण्याचे प्रकार थांबविण्यासाठी पुलाची उंची वाढूं देऊन पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेतकरी वर्गाना भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी वारंगटाकळी, मंगरूळ, खैरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.