वाहनधारक, नागरिक, शेतकरी वर्गातून ठेकेदार व अभियंत्याचे धन्यवाद मानले जात आहेत
हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या ३ वर्षांपासून सुरु असलेल्या अर्धापूर-फुलसांगवी रस्त्यावरील पर्यायी पूल वाहून गेल्याने बुधवारी सकाळपासून वाहतूक ठप्प होती. याबाबतचे वृत्त नांदेड न्यूज लाइव्हने प्रकाशित करताच रुद्राणी कंपनीच्या ठेकेदारने यंत्रणा कामाला लावून रात्रीलाच वाहतूक सुरु केली आहे. एवढेच नाहीतर पावसाळ्यात पुन्हा हि वेळ येणार नाही यासाठी पुलाच्या कामाला गती देण्यात आली असून, लवकरच पुलावरूनही वाहतूक सुरु होईल अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे वाहनधारक, नागरिक, शेतकरी वर्गातून ठेकेदार व अभियंत्याचे धन्यवाद मानले जात आहे.
मंगळवारच्या रात्रीला झालेल्या मुसळधार पावसामुळे अर्धापूर - फुलसांगवी या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावरील आष्टी नजीकचा पर्यायी पुल वाहून गेल्यामुळे हदगाव - हिमायतनगर मार्ग बुधवारी सकाळपासून बंद झाला होता. याबाबतची माहिती मिळताच नांदेड न्यूज लाईव्हने सर्वप्रथम वृत्त प्रकाशित करून वाहतुकीचा अढथळा दूर करण्याची मागणी केली होती. याची दाखल घेऊन संबंधित अभियंता आणि ठेकेदारने आपली यंत्रणा गतीने कामाला लावली. एवढेच नाहीतर रात्र होण्यापूर्वी वाहतूक सुरळीत केली आहे. तसेच येथील रखडलेल्या पुलाच्या कामाला देखील गती दिली असून, येत्या काही दिवसात या पुलावरऔन वाहतूक सुरळीत करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
सदरील रस्ता पूर्ववत चालू झाल्याने आगामी पावसाळ्यात नागरीकी, वाहनधारक व शेतकरी वर्गाना निर्माण होणार अडथळा दूर होऊन आष्टी, कांडली, पारवा या लांब पाल्याचा मार्गाच्या प्रवसापासून सुटका मिळणार आहे. तसेच या मार्गावर असलेल्या अन्य पुलाचेही राहिलेली कामेदेखील लवकरच पूर्ण करून नागरिकांची समस्या कायमची सोडविल्या जाईल असे ठेकेदारच्या कामाची देखरेख करणार्यांनी सांगितले आहे.
याशिवाय अर्धापूर हिमायतनगर या रस्त्यावरील तामसा नदीवरील पूल वगळता ईतर सर्व पुलांवरून वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. तसेच तामसा नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत याही पुलावरील वाहतूक सुरळीत चालू करण्याबद्दलचे नियोजना सदर ठेकेदार व संबंधित अभियांत्या कडून देण्यात आले.