विठोबा रूक्माई च्या गजरात श्री संत साधू महाराज खंदारकर संस्थांन यांच्या दिंडीचे पंढरपूराकडे रवाना -NNL


कंधार, सचिन मोरे।
श्री संत साधू महाराज खंदारकर संस्थांन यांची सातशे वर्षापासून पंढरपूराकडे पायी जाणारी दिंडी याही वर्षी संस्थानचे सातवे वंशज मठाधिपती गुरुवर्य ह. भ. प. एकनाथ महाराज साधू यांच्या नेतृत्वाखाली टाळ-मृदुंगाच्या निनादात व विठोबा - रूक्माईच्या गजरात  पंढरपूराकडे रवाना झाली आहे. 

मंगळवार दि.२१ रोजी दोनशे-अडीचशे वारकरी घेउन निघणारी हि दिंडी पंढरपूरात पोंहचते तेव्हा पंचेविस हजार पर्यंत पोहचते. मराठवाडयातील पहिल्या क्रमांकाची दिंडी म्हणून मानाची दिंडी समजली जाते. प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही संस्थानचे सातवे वंशज मठाधिपती श्री. ह. भ. प. एकनाथ महाराज साधू यांच्या नेतृत्वाखाली सकाळी बारा वाजता श्री. संत साधू महाराज संस्थांन पासून सर्व वंशज मठाधिपतीच्या व देवदेवतांच्या आरती करून मार्गस्थ झाली.हि दिंडी कंधार, लोहा,माळाकोळी, माळेगाव, सांगवी, अहमदपूर, शिरूर, चापोली, चाकुर, घरणी,भातखेडा, लातुर, साकरा, बोरगाव, मुरूड,ढवळाला, तडवळे, येडसी, घारी, जामगाव, बार्शी, म्हैसगाव, कुर्डूवाडी, कुर्मदास, आरण, आष्टी, आढीव, पंढरपूर अशी मार्गस्थ होणार आहे.

हि दिंडी पंढरपूरात आषाढ शुद्ध. आष्टमी ८ ( ७ जुलै) रोजी पंढरपूरात पोहचणार आहे.ह्या दिंडीत ज्ञानेश्वर साधू महाराज, नरसिंग करेवाड, मारोतराव येईलवाड,श्रीराम करेवाड, संदीप महाराज आलेगांवकर, एकनाथ गोठमवाड, गंगाधर कावडे, आरूण येईलवाड,माना साहेब, हणमन्नल्लू आदी जण सदर दिंडीचे नियोजन करतात.अडीशे ते तिनशे अंतर प्रतीदिवस पंधरा ते विस कि.मी.अंतर पार केले जाते. दिवसागणिक गावकरी चहा, नाश्ता, जेवण व राहण्याची सोय करतात. रात्री महाराजाचे हरिकिर्तन होते. अन उजाडताच  गावातील वारकरी सामील होताच पुढच्या प्रवासाला दिंडी निघते.दिंडीचे प्रस्थान होताना शहरात ठिकठिकाणी स्वागतकमानी, फटाक्यांची आतषबाजी, फराळ, नास्ता, चहा पाण्याची व्यवस्था भक्तगणांनी केली होती. 

दिंडीस गावच्या हद्दीबाहेरील नेण्यासाठी विविध पक्षांचे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, नगराध्यक्ष रामराव पवार,जि. प सदस्य विजय धोंडगे, शिवसेनेचे गणेश कुंटेवार, शिवराज धोंडगे, मा. जि. प सदस्य संजय भोसीकर, नगरसेवक शहाजी नळगे, नगरसेविका वर्षाताई गणेश कुंटेवार, राजकुमार केकाटे, उपसरपंच हणमंत पेठकर, राम बनसोडे, रमाकांत मामडे,  पुरूषोत्तम संगेवार, भास्करराव खोडसकर , बार्शिकर महाराज ह अनेक प्रतिष्ठित नागरिक व महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी