श्री गुरूग्रंथसाहिब भवन येथे भव्य प्रमाणात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा -NNL


नांदेड।
 निरोगी आयुष्यासाठी योगाची साधना आवश्यक असून हा संदेश सर्व सामान्यापर्यत पोहचावा व नागरिकांनी अधिकाधिक आपल्या निरोगी आरोग्यासाठी योगाकडे वळावे या उद्देशाने आज श्री गुरूग्रंथसाहिब भवन नांदेड येथे आठवा आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. 

नांदेड जिल्हा प्रशासन, पतंजली योग समिती, विविध संस्था यांच्या सहभागातून भव्य प्रमाणात साजरा झालेल्या या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, सौ. सविता बिरगे, गुरुद्वाराचे सहाय्यक अधिक्षक हरजितसिंग कडेवाले, डॉ. हंसराज वैद्य, जिल्हा क्रीडा अधिकारी आर. एस. मारावार, पंतजली योग समितीचे योग प्रसारक अनिल अमृतवार, आदी मान्यवर उपस्थित होते.


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हा योगदिन अधिकाधिक व्यापक करण्यात आला. जिल्हाभर योगाभ्यासाच्या माध्यमातून सुदृढ आरोग्याचा संदेश पोहचावा व सहज करता येण्या योग्य अशा या महत्वपूर्ण आरोग्य साधनेशी लोक जुळावेत या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने या योग दिवसासाठी भव्य तयारी करण्यात आली होती. पंतजली योग समिती यांनी पुढाकार घेतलेल्या या समारंभास गुरुद्वारा बोर्डने सहकार्य केले.

 योगअभ्यासक अनिल अमृतवार यांनी उपस्थितांकडून योगा प्रात्याक्षिकाचे धडे दिले. आयुष मंत्रालयाने दिलेल्या शिष्टाचारानुसार योगक्रियेचा समावेश करण्यात आला होता. या समारंभात गुजराथी हायस्कुल, राष्ट्रीय गांधी हिंदी विद्या मंदिर, जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूल, मनपा प्राथमिक शाळा, खालसा हायस्कूल, सचखंड पब्लिक स्कूल, आंध्रा समिती हायस्कूल या शाळेचे विद्यार्थी, एनसीसी स्काउट गाईडचे विद्यार्थी, विविध क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महारुद्र माळगे यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी