वाजत गाजत मिरवणूक काढून पहिल्या वर्गात प्रवेश -NNL

शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप; 'पहिलं पाऊल' उपक्रमास पालकांचा प्रतिसाद


नांदेड|
कोरानाकाळाच्या भयावह कालखंडानंतर चालू शैक्षणिक वर्षात शाळा अत्यंत उत्साहात आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांनी सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत जवळा दे. येथे मोफत शालेय पुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता पहिलीतील प्रवेशपात्र मुलामुलींचा वाजतगाजत मिरवणूक काढून प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. तसेच 'पहिलं पाऊल' या उपक्रमासही पालकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ढवळे जी. एस. विषय शिक्षक तथा शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर, विषयतज्ज्ञ सचिन किरवले, सहशिक्षक संतोष घटकार, मारोती चक्रधर, मंचक पाटील, हैदर शेख, कमलबाई गच्चे, अंगणवाडी कार्यकर्ती इंदिरा पांचाळ, सुलोचना गच्चे आदींची उपस्थिती होती.

शाळापूर्व तयारी मेळाव्याअंतर्गत इयत्ता पहिलीतील प्रवेशपात्र मुलामुलींचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर वाजतगाजत गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढून प्रवेश देण्यात आला. प्रशासनाच्या सुचनेनुसार शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन जवळा देशमुख येथे करण्यात आले होते. यात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या संकल्पनेतून 'पहिलं पाऊल'या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीतील प्रवेशपात्र मुलामुलींच्या पावलांचे ठसे कागदावर घेण्यात आले. त्यानंतर घेण्यात आलेल्या पालक मेळाव्यास शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर यांनी संबोधित केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.


शाळापूर्व तयारी उपक्रमास सरपंच साहेब शिखरे, कैलास गोडबोले, आनंद गोडबोले, बालाजी पांचाळ, संभाजी गवारे, तुकाराम गोडबोले, मिलिंद गोडबोले, गौतम गोडबोले, साक्षी गोडबोले, मुस्कान पठाण, अक्षरा गोडबोले,  सिद्धार्थ पंडित, शुभांगी गोडबोले, बाळासाहेब देशमुख, बाबुमियाँ शेख, पांडूरंग गच्चे, नितीन झिंझाडे, मोखिंद गोडबोले, आप्पाराव शिखरे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे सदस्य, माहिती अधिकार कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी नागरिक, स्थानिक पातळीवरील सामाजिक कार्यकर्ते तथा लोकप्रतिनिधी, अभ्यासक, निवेदक, शाहिर, लोकप्रबोधक आदींचा प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी