मालेगाव परिसरात खुलेआम मटक्याचा धंदा ; मटका बुकी ची चलचित्र फित समाज माध्यमावर प्रसारीत-NNL


मालेगाव, सुभाशिष कामेवार। 
मालेगाव पोलीस चौकी अंतर्गत तब्बल 18 गावांचा समावेश आहे, या तिल मालेगाव सह निम्म्या गावात मटक्याच्या खुलेआम धंदा सुरू आहे परंतू मालेगाव पोलीस चौकी चे अधीकारी व कर्मचारी मात्र या कडे अर्थपुर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. अशाच एका मटका बुकी ची चलचित्र फित समाज माध्यमावर प्रसारीत होत आहे परंतू येव्हडे होऊनही पोलीसांनी मात्र ह्या बुकी चालकांवर गुन्हा दाखल करन्याची तसदी घेतलेली दिसत नाही. 

सामान्य कष्टकरी लोक मात्र या मटक्याच्या नादाला लागून आर्थिक दिवाळखोरी करून घेत आहेत परंतू सामाजीक स्वास्थ बिघडते की चांगले राहते याचे पोलिसांना कुठे देणे घेणे आहे त्यांना फक्त आर्थिक मोदके घेणे येव्हडेच महत्वाचे आहे.काही दिवसांपूर्वी मालेगाव चौकी मध्ये एका पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने मटका चालकांना पकडून आनले खरे मात्र गुन्हा दाखल न करताच सोडून दिले होते. 

या वृत्ता नंतर तरी वरीष्ठ अधिकारी दखल घेऊन मटका बुक्या चालवनार्यावर गुन्हा दाखल करतील की पुन्हा चौकी त आणुन मांडवली करून सोडतील हे पाहने महत्वाचे आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी