उद्योजकता विकास अंतर्गत महिलांसाठी मोफत टेलरिंग प्रशिक्षण; आरसेडी व उमेदचा उपक्रम -NNL


नांदेड।
 भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी महिला टेलरिंग प्रशिक्षणाचे आयोजन ते 30 जुन 2022 पर्यंत आरसेडी नांदेड येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा प्रशिक्षक गजानन पातेवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी उमेद अभियानाचे राम भलावीअतिष गायकवाडकौशल्य समन्वयक प्रियंका चव्हाणबालाजी गिरीआशिष राऊतविश्वास हटृटेकर यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षणात नांदेड जिल्ह्यातील 18 ते 40 वयोगटातील महिला सहभागी होऊ शकतात. आतापर्यत 35 महिलांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेतला आहे.

 प्रशिक्षणात उद्योजकता विकासकौशल्य विकास अंतर्गत उद्योजकता सक्षमता कार्य दृष्टिकोनसंभाषनकौशल्यवेळेचे नियोजनबँकिंगप्रकल्प अहवालमार्केटिंग सर्व्हेआर्थिक साक्षरताइंग्रजी ज्ञानबेसिक संगणक ज्ञानशासकीय योजनासामाजिक सुरक्षा योजनातसेच शिवणकला अंतर्गत विविध विषयांचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षक ज्योती वांगजे या महिलांना मोफत प्रशिक्षण देवून त्यांना कार्यकुशल करण्याचे काम करीत आहेत. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थ्यांची निवासी आणि जेवणाची मोफत सोय करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रूनिता अर्ध्यापुरकरअभिजित पाथरीकरमारोती कांबळे यांनी परीश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी