विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाचा उत्सव साजरा
नांदेड| येथील तरोडा खु. बेलानगर भागात असेल्या राष्ट्रमाता विद्यामंदिर शाळेमध्ये शाळा भरण्याच्या पहिल्या दिवशीच पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास सुलभ जावे, तसेच त्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून अभ्यासाची गोडी लागावी, यासाठी तरोडा खु भागात असलेल्या राष्ट्रमाता विद्यामंदिर शाळेमध्ये पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव अवधूतराव क्षीरसागर हे होते तर पालक प्रतिनिधी म्हणून सौ. कावळे यांची उपस्थिती होती.
शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा क्षण असतो विद्यार्थ्यांनी हसत खेळत शिक्षण घेऊन ज्ञान संपादन करावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करून प्रत्येक बालक सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा असे प्रतिपादन संस्थेचे सचिव पाटील क्षीरसागर यांनी केले आहे.
यावेळी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी आभार मुख्याध्यापक दिगंबर जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला सहशिक्षक सुनिल जोंधळे, सी.डी. क्षीरसागर, एस.बी.गिरी, जी.एस. जाधव, यांनी परिश्रम घेतले.