नांदेड। जिल्ह्यात सोमवार 21 जून रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 6.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 74.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आज रात्री पासून रिमझिम पावसालासुरुवात झाली आहे, आत्ता हा पाऊस पेरनियोग्य होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
जिल्ह्यात मंगळवार 21 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 7.1 (46), बिलोली- 5.8 (57.5), मुखेड- 6.3 (103.6), कंधार-3.2 (106.2), लोहा-3.6 (67.6), हदगाव-4.5 (46.2), भोकर- 6.6 (66.2), देगलूर-8.9 (127.7), किनवट- 7 (81.5), मुदखेड- 26.4 (103.4), हिमायतनगर-6.7 (54.1), माहूर- 5 (84.5), धर्माबाद- 9.1 (42.7), उमरी- 4.2 (81.7), अर्धापूर- 2.8 (46.7), नायगाव- 0.4 (50.4) मिलीमीटर आहे.