हिमायतनगर। हिमायतनगर येथील महाराष्ट्र ग्रामिण बँकेने रा. डोल्हारी येथील रहीवाशी असलेले मयत यादव धोंडबा नरवाडे यांची प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत विमा उतरवण्यात आला होता.
सदर व्यक्ती मयत झाल्याने प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेतून मयत यादव धोंडबा नरवाडे यांच्या वारसदार असलेल्या पत्नी श्रीमती ललीताबाई यादव नरवाडे यांना दोन लाखाचा विमा मंजुर झाला होता. मंजुर झालेले दोन लाख रूपये वारसदार ललीताबाई धोंडबा नरवाडे यांना हिमायतनगर येथील महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे शाखा व्यवस्थापक मनिष खोडे यांच्या हस्ते त्याना धनादेश सुपुर्द करून त्यांच्या खात्यात सदरील रक्कम जमा केली.
शाखा व्यवस्थापक मनिष खोडे पुढे बोलताना म्हणाले कि, महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या खातेदारांनी आपला विमा उतरवून घ्याव असे आवाहन केले आहे. यावेळी सहाय्यक व्यवस्थापक ऋषिकेश मुळे, शरद सर, श्रीमती बोरकर मँडम, बँक कर्मचारी विजयकुमार शिंदे, संदीप कदम, किशोर जयस्वाल, परमेश्वर काळे, परमेश्वर शिंदे, संतोष गोरे, ऋषिकेश सोनटक्के यांच्यासह डोल्हारी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.