भोकर। दरवर्षी २८ मे हा दिवस " मासिक पाळी स्वच्छता जनजागृती दिवस " म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने दि. २८ मे रोजी " राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम " अंतर्गत मोघाळी ता.भोकर येथील शाळे मध्ये मासिक पाळी स्वच्छता जनजागृती दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी/ स्वच्छता, समाजात असणाऱ्या समज -गैरसमज, मासिक पाळी संदर्भात सामाजीक दृष्टीकोन, किशोरवयीन मुलींचे आहार, किशोरवयीन वयात लोहयुक्त गोळ्यांच महत्त्व, सॅनिटरी न्यापकीनच योग्य वापर, गर्भ निरोधक साधनाचे महत्व, किशोरवयीन वाढ व विकास, तसेच किशोरवयीन मुलींचे इतर समस्यावर चर्चात्मक मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच किशोरवयीन मुलींना लोहयुक्त गोळ्या, व सॅनिटरी न्यापकीन वाटप करण्यात आले यावेळी डॉ. पवार मॅडम, डॉ.तोटावाड मॅडम, दादाराव माचेवाड आरोग्य सहाय्यक, श्रीमती बंडावार आरोग्य सेविका, सूर्यवंशी सुरेश डुम्मलवाड (आरकेएसके समुपदेशक) आशा वर्कर पंतुलवाड, अंगणवाडी सेविका तसेच किशोरवयीन मुली उपस्थित होते.