नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या विविध विभागांच्यी शनिवारी सुट्टी चा दिवशी सहाय्यक आयुक्त डॉ.रईसौदीन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभाग व कर्मचारी यांनी सफाई केली.
नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे नव्याने नियुक्त झालेले सहाय्यक आयुक्त डॉ.र ईसोधदीन यांनी ११ मे ला पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम प्रलंबित कामाचा निपटारा व मनपा उत्पन्न वाढीसाठी वसुली कर निरीक्षक , लिपीक यांच्यी बैठक घेऊन थकबाकी मालमत्ता धारक यांच्या कडे वसुली साठी प्रयत्न करणे यासह मार्गदर्शक सूचना केल्या,तर अनेक प्रलंबित संचिका व नाव परिवर्तन त्रुटया काढून संबंधितांना दिल्या.
क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या नाव परिवर्तन, जन्म मृत्यू , पाणीपुरवठा, मालमत्ता कर विभाग,आवक जावक यासह अनेक विभागांत गेल्या अनेक वर्षापासून साफ सफाई नसल्याने व संचिका ईतरत विखुरलेल्या अवस्थेत राहिल्याने संबंधित विभागाच्या प्रमुखांना सुचना देऊन शनिवार २८ मे रोजी सकाळी सहाय्यक आयुक्त डॉ.र ईसोधदीन , कार्यालय अधीक्षक विलास गजभारे व स्वच्छता निरीक्षक अर्जुन बांगडी ,कर निरीक्षक दिपक पाटील, सुधीर बैस , लिपीक मालु एनफळे, सुखदेव जोंधळे, मारोती चव्हाण, संतोष भदरगे, पवळे,मदन कोल्हे, संदीप धोंडगे
व कार्यालयीन कर्मचारी प्रभु गिराम,आरकुले, राजरत्न जौधंळे, सुनिल ताटे ,मदनसिंह बैस, कुलकर्णी यांच्या सह कर्मचारी या स्वच्छता अभियान मध्ये ऊपसिथीत होते. यावेळी स्वच्छता विभागाच्या महिला व पुरुष यांच्या साहाय्याने गेल्या दहा वर्षांपासून धुळखात पडलेला अनेक विभागां मधील कचरा व ईतर साहित्य ,संकलन करून एक ट्रकटर व मिनीडोअर वाहनाने भरून काढला ,हि मोहीम रविवारी सुध्दा राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त डॉ.र ईसोधदीन यांनी सांगितले.