हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या ८ दिवसापासून हिमायतनगर (वाढोणा) शहरातील हुजपा महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरु असलेल्या निशुल्क योग विज्ञान शिबिराचा समारोप ऑक्सिजन देणाऱ्या साहित्याचा वापर करून महायज्ञाने करण्यात आला. यावेळी यज्ञास ३५ दाम्पत्यांनी सहभाग घेतला होता.
पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान ट्रस्ट, युवा भारत, किसान सेवा समिती आणि परमेश्वर मंदिर ट्रस्ट आणि माजी केंद्रीय राज्य मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या सौजन्याने हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा महाविद्यालयाच्या प्रांगणात दि.२१ में पासून योग विज्ञान शिबिर सुरु करण्यात आले होते. या शिबिरात विविध आजारावर मात करणारी आसने, योग प्राणायामचे धडे यासह आयुर्वेदाचे महत्व पटून देण्यात आले आहे. शिबिराच्या चौथ्या दिवशी शहरातील मुख्य रस्त्याने विविध प्रकारचे व्यसनमुक्तीचा संदेश देणारे फलक हाती घेऊन महिला-पुरुष साधकांच्या सहभागातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. त्यानंतर शिबिरात दररोज वेगवेगळ्या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन व आरोग्याच्या संदर्भाने ज्ञान दिले.
शिबिराच्या आठव्या दिवशी समारोपाच्या निमित्ताने सर्व योग साधकांच्या पुढाकारातून शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि शिबिरात घेतलेल्या ज्ञानाचा व योगाचा फायदा सर्वाना व्हावा हि उद्दात हवाना ठेऊन पर्यावरण संतुलन, पाऊसमान भरपूर व्हावे, धनधान्य भरपूर पिकावे, गोवंश वाढावा, रोगराई मुक्त जीवनासाठी शांती यज्ञ करण्यात आला. या यज्ञास जवळपास ३५ दाम्पत्यांनी सहभाग घेऊन यज्ञ केला. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करून समारोप करण्यात आला. यावेळी शहरातील शेकडो महिला- पुरुष, बालके व अबालवृद्ध नागरिक उपस्थित होते. यावेळी या शिबिरासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचे स्वागत सत्कार करून आभार मानण्यात आले. विशेष करून या यज्ञासाठी लागलेली फुल, हार येथील अजिंठा फुल भंडारचे संचालक हिदायत खान यांनी निशुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या योग गुरूंच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मागील आठ दिवसाच्या शिबिरात पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी सुरेशजी लांगडापुरे, पतंजली योग समितीचे जिल्हा सहप्रभारी अशोकजी पवार यांच्यासह नांदेडच्या अनेक मान्यवरांनी उपस्थित होऊन शिबिरातील साधकांना आयुर्वेद आणि योगाचे धडे दिले. तसेच सर्वाना निरामय आयुष्य प्रधान व्होहो अश्या शुभेच्छा देत सातत्याने योग, ध्यान, प्राणायाम करा आणि निरोगी राहा असे आवाहन केले.