अर्धापूर। शिवसेना पक्षाने शेतकरी व शेतमजूर यांच्या साठी स्थापन केलेल्या शेतकरी शेतमजूर सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी मालेगाव ता.अर्धापूरचे अभ्यासू शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांची नियुक्ती केली. शिवसेनेचे उपनेते प्रा नितीन बानुगडे पाटील अध्यक्ष आहेत. इंगोले यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेने शेतकरी शेतमजूर सेनेची राज्य कार्यकारणी जाहीर केली त्यात आक्रमक अभ्यासू व लढाऊ शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांची या राज्य कार्यकारिणीवर प्रदेश सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली या निवडीचे स्वागत होत आहे. असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यवस्थेच्या पुढे मांडण्यासाठी इंगोले हे या पदाचा नक्कीच चांगला उपयोग घेतील.
शेती प्रश्नांची जाण व अभ्यास असणारे इंगोले यांनी देशभरातील शेती व शेतकऱ्यांच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत . तसेच पत्रकारितेच्या माध्यमातूनही त्यांनी शेती प्रश्नाला विविध वृत्तपत्रातून नेहमी वाचा फोडण्याचे काम केले .ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी इंगोले यांनी लोकवर्गणी उभी करून राज्यातील प्रस्थापित साखर कारखानदारांच्या विरोधात आवाज उठवला होता.