एस टि कॅन्टीन अँड स्टॉल वेल्फेअर तर्फे खा शरदचंद्र पवार याना निवेदन -NNL


लोहा।
एस टि कॅन्टीन अँड स्टॉल वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य  कार्य करणी covid-19 विश्व महामारीमुळे महाराष्ट्रासह जागतिक व्यापार ठप्प झाला होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील बस सेवाही ठप्प झाली होती स्थानकावरील आस्थापना शासनाच्या आदेशा प्रमाणे बंद ठेवाव्या लागल्या होत्या. 

त्याप्रमाणे करोणाच्या तीन लाटेतही संपूर्ण महाराष्ट्रातील आस्थापना दहा महिने बंद होत्या त्यानंतर रा प कर्मचारी यांचा संपा मुळे एसटी वाहतूक सहा महिने बंद होती त्यामुळे आस्थापना ही बंद होत्या. त्या अनुषंगाने आस्थापना धारक अस्थापनाचे 10+06 महिन्याचे भाडे माफीसाठी राज्याचे जानते राज्य माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष श्री राम हराळ साहेब विजयकुमार ऐताळ सचिव मालेगाव मारुती तुपेकर कार्याध्यक्ष नांदेड सुरेंद्र जी अग्रवाल कल्याण नंदकिशोर पाटील अहमदपूर मौलाली मुल्ला अक्कलकोट लक्ष्मण पवार  विजय चन्नावार सय्यद सिकंदर डी टी सूर्यवंशी हजर होते खासदार शरदचंद्र पवार साहेबानी आस्वासन दिल्या मूळे सर्व महाराष्ट्रतील एस टि कॅन्टीन अँड स्टॉल वेल्फेअर असोसिएश वतीने आभार मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी