पाण्याची बकेट गळ्यात अडकून हरणाचा मृत्यू... वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती -NNL


हिमायतनगर।
तालुक्यातील मौजे कारला शिवारातील विहीरीवर पाणी पिण्यासाठी आलेल्या हरण बकेट मधील पाणी पित असतांना पाणी पीण्याच्या नादात गळ्यात बकेट अडकुन घेतल्यामुळे हरणाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या भागात वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. याकडे वनविभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.


सध्या उन्हाची तिव्रता वाढली असून, अंगाची काहिली होत असल्याने हरीण, निळ, वानर,रोही यासारखे वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी रानोमाळ भटकंती करीत आहेत. जंगलातील पाणवठे असल्यामुळे गाव परिसरात आगेकूच करत आहेत. असाच हरणाचे कळप कार्ला शिवारात आले होते, त्यापैकी एक हरण कारला शिवारात रविवारी शेतकरी काशिनाथ सोनबा रासमवाड यांच्या शेतात पाणी भरून असलेल्या बकेट मधील पाणी पित असतांना हरणाच्या गळ्यात बकेट अडकली.


गळ्यात बकेट अडकल्या तांराबळ उडाली मात्र बकेट निघाली नाही. त्यातच हरणाचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेची माहिती शेतकरी यांनी वनरक्षक अमोल कदम यांना दिली. असता त्यांनी वाशी भागाचे  वनरक्षक नारायण गिते यांना कळविताच पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के, वनमजुर अहेमद ,प्रकाश पवार, प्रकाश मेंडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून शवविच्छेदन केले . शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात वन्य प्राण्यांसाठी पानवठे करून ठेवल्यास पाणी पिण्यासाठी आलेल्या वन्यप्राण्यांचे जिव वाचतील असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनटक्के यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी