नांदेड। शासनामार्फत नियोजित ओबीसी समर्पित आयोग यांना ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज निवडणूक घटना दुरुस्ती व आरक्षण संदर्भात सकल भावसार समाज सेवा संस्था मराठवाडा तर्फ औरंगाबाद येथे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी ओबीसी समजा अंतर्गत भावसार समाजाच्या सर्व आरक्षण संदर्भात राजकीय व शैक्षणिक आरक्षण बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली, या प्रसंगी समाजाचे अध्यक्ष जगदीश यादवराव चव्हाण व महासचिव सुमित सुधाकरराव करोडे यांची उपस्थिती होती . चर्चे प्रसंगी भावसार समाजावर सतत चालू असलेल्या अन्याय मग तो राजकीय असो व शैक्षणिक यावर आयोग समितीसोबत प्रखर चर्चा व अडचणी बाबतीत श्री जगदीश चव्हाण यांनी समितीला योग्य रित्या मांडणी केली, हया चर्चे वेळेस जर भावसार समाजाला न्याय न मिळाल्यास समाजाचे महासचिव सुमित सुधाकरराव करोडे यांनी आत्मदहानाचा पर्याय निवडावा लागेल असा इशारा दिला असून, आयोग समितीने योग्य न्याय देऊ असे आश्वासन शासना मार्फत सकल भावसार समाज सेवा संस्था मराठवाडा यांना दिला आहे.
सदरील कार्याचे नियोजन व मार्गदर्शन अनिल सूत्रे, भालचंद्र तांदळे, सुधीर शेळके, मनोज ढवळे, नरेद लांडे, गोपाळ कंकाळ, रामराव खपले, सचिन तांदळे, अनिल जोगे, उत्तम केदारी,पंडित भागवत, रोहित हंचाटे,सौ वैशाली माळवे, प्रवक्ता द्वारकदास फटाले, मुरलीधर चांडगे, राजेंद्र चव्हाण, लक्ष्मीकांत कंकाळ, गुलाब पतंगे, राजहंस जाधव, अनिरुध्द दांडगे, सुनील काकडे, उन्मेश हिबारे व सर्व सदस्य सकल भावसार समाज सेवा संस्था मराठवाडा यांचे लाभले .यापुढे भविष्यात तीव्र आंदोलन करून भावसार समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत मोठ्या स्वरूपात लढा देण्याची तयारी व्यक्त करण्यात आली .