नांदेड। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सव निमित्त आज दि 28 मे रोजी श्री क्षेत्र माळेगाव (खंडोबा यात्रा) येथून निघणार दिंडी शोभायात्रा निघणार आहे,अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा दिंडी यात्रेचे संयोजक संभाजीराव धुळगंडे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंती निमित्तप्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा ता.लोहा जि. नांदेड येथून पुण्यश्लोक अहिल्यामातेचे जन्मस्थळ अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. आज दि. २८/०५/२०२२ शनिवार ते दि. ३१/०५/२०२२ मंगळवार पर्यंत रथ शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. परचंडा हनुमान, अंबामाई, चाकरवाडी, मन्मथस्वामी, पुण्यश्लोक अहिल्यामातेचे जन्मस्थळ अहिल्या सृष्टी, अहिलेश्वर महादेव या तिर्थस्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत. या यात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून भजन,किर्तन, व्याख्यान, सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन धुळगंडे यांनी केले आहे. जवळपास 200 जण यात्रेत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यात्रा यशस्वी होण्यासाठी छगन चिमाजी पाटील खटके (भिवंडी), शराहुल छगन पाटील खटके (नगरसेवक, भिवंडी),गणेश दादा हाके (प्रवक्ता, भाजपा), गंगाप्रसाद काकडे (कौठा), अॅड. चंद्रसेन पा. गौंडगावकर (गौंडगाव), प्रकाश गोपनर (नांदेड),माणिकराव लोहगावे (नर्सी), गंगाधर देपे (कोपरा), पांडुरंग काकडे (कौठा), आप्पाराव पांढरे (बाबूळगाव), भगवानराव हाके (मंगरूळ), हणमंत धुळगंडे (माळेगाव), पिराजी नागोराव धुळगंडे (पोलेवाडी), श्बालाजी भाऊराव पोले (पोलेवाडी),अँड श्री शिवाजीराव हाके (ज्येष्ठ विधीज्ञ, अध्यक्ष शोभा यात्रा), इंजि. श्री बालाजीराव काळे (सचिव, शोभ यात्रा) ,प्रा. मुरहरी कुंभारगावे (कार्याध्यक्ष, शोभा यात्रा) , प्रा. संजीव म्हेत्रे (कोषाध्यक्ष शोभा यात्रा) ,संभाजी गोविंदराव धुळगंडे (शोभा यात्रा चालक) ,किशनराव टेकाळे (प्रसिध्दी प्रमुख), गोविंद गोरे (प्रसिध्दी प्रमुख), परसराम वडजे (गुंडेवाडी), निळकंठ उराडे (दगडगाव), माधव बंके (संगुचीवाडी), सुरेश पोले (पेंडू), केरबा शेंडगे (पोलेवाडी), बालाजी गुंडे (गुंडेवाडी), संतोष नरवटे (चोरंबा) यांचे सहकार्य लाभले आहे. शोभा यात्रेला नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.