नवीन नांदेड। वासवी व वनिता क्लब चा वतीने हडको बालाजी मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर व आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा २१ ते २७ मे कथाकार हभप गुरूवर्य चैतन्य महाराज कंधारकर यांच्या सुमधुर वाणीतुन भागवत कथा आयोजित करण्यात आली होती. यजमान म्हणून जयश्री संतोष तमेवार,तर आयोजन लक्ष्मण तमेवार यांनी केले होते. या कथेच्या सांगता आज २७ मे रोजी सोहळा संपन्न झाला. यावेळी भक्त गणासह पदाधिकारी व नागरीक ऊपसिथीत होते.
वासवी व वनिता क्लबच्या वतीने मोफत तपासणी शिबिर, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नरेश रायेवार , सतिश वटमवार, व बालाजी मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष अरुण दमकोडंवार व पदाधिकारी यांच्या ऊपसिथीती होती. यावेळी आयोजित मोफत तपासणी आरोग्य शिबीर मध्ये तज्ञ डॉक्टर डॉ. राहुल कोटलवार, डॉ.अजय मुंदडा, डॉ. सोनटकके, डॉ.निता रायेवार यांनी या शिबिरात विविध आजारांवर सहभागी झालेल्या रूंग्नाची तपासणी केली.
या शिबिरात रक्त संकलन गुरू गोविंद सिंघजी ब्लड बँकेच्या वतीने करण्यात आले या वेळी रक्त पेढीचे श्रीकृष्ण संत ,राजू जाधव ,राहूल वाघमारे तंत्रज्ञ सरस्वती नरलावाड,मनीषा खांबे, सहायक उद्धव मुळे यांनी केले, शिबीर यशस्वितेसाठी सिडको वासवी क्लबचे शिवानंद निलावार, बालाजी कवटीकवार,संदीप येरावार व सिडको वनिता क्लब चा छाया निलावार,सूनिता कवटीकवार,कोमल येरावार व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.