सीईओ वर्षाताई ठाकूर यांच्या आदेशाने आसची मागणी पूर्ण;अखेर सीएमपी प्रणालीद्वारेच शिक्षकांचे वेतन अदा -NNL


नांदेड।
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक बांधवांच्या एप्रिल महिण्याच्या  वेतनासाठी, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षाताई ठाकूर यांच्या हस्ते संगणकावरील कळ दाबून सीएमपी झेडपीएफएमएस प्रणाली कार्यान्वित केली.  त्यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सौ. सविता बिरगे , मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांच्यासह शिक्षण  विभाग, अर्थ विभाग , महाराष्ट्र बँकेचे अधिकारी तसेच 'आस ' शिक्षक  संघटनेसह अन्य संघटनेचे  पदाधिकारी उपस्थित होते.

 सी.एम.पी. लागू केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षाताई ठाकूर ,  शिक्षणाधिकारी डॉ. सौ. सविता बिरगे , मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा.शिवप्रकाश चन्ना यांचा 'आस '  शिक्षक संघटनेच्या वतीने सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच  शिक्षण विभागाच्या सीमपी कार्यात,  तळमळीने योगदान देणारे अनिल कांबळे,बोराटे,कोकूलवार आदी शिक्षकांचेही 'आस'ने आभार व्यक्त केले. 


यापूर्वी जि.प.च्या वित्त  विभागाद्वारे शिक्षकांच्या वेतानाचे वित्तप्रेषण बीडीओ यांचेकडे  जात होते.तद्नंतर मुख्याध्यापक  यांचेकडून वेतन जमा व्हायचे.या प्रक्रियेमुळे वेतनास विलंब होत होता. त्यामुळे शिक्षकांचे वेतन वेळेवर व्हावे म्हणून 'आस ' शिक्षक संघटनेने सन २०१७ पासून राज्य व जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार करून अनेकदा चर्चा केली.  अनेकदा आंदोलनाचा पावित्रा सुध्दा घेतला होता. तसेच मागील निवेदनाचा संदर्भ देवून दि.२२ एप्रिल २०२२ रोजी ई मेलद्वारे मुख्यमंंत्र्यांस निवेदन पाठवले होत.

त्या निवेदनाद्वारे  जि.प.समोर ' रक्तमिश्रीत दुधाने स्नान  करून मुंडन' करण्याची आंदोलनात्मक भूमिका   'आस' ने  मांडली होती. त्या निवदनाची प्रतिलिपी  शिक्षणमंंत्री ,शिक्षण आयुक्त व नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांस पाठवले होते.  त्या निवेेेदनाची दखल घेवून शिक्षण आयुक्त  सुरज मांढरे यांनी दि.५ मे २०२२ रोजी एक पत्र   काढून, राज्यातील सर्व   शिक्षकांचे  वेतन वेळेवर होण्यासाठी  सीएमपी झेड.पी.एफ.एम.एस प्रणालीचा अवलंब  करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले.

तसेच 'आस' च्या निवेदनातील मागणीची दखल नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही घेतली आणि दि. ५ मे  २०२२ रोजी एक पत्र काढून, सीएमपी झेडपीएफएमएस प्रणालीद्वारेच शिक्षकांचे  वेतन अदा करण्याचे आदेश दिले. तेंव्हा कुठे वित्त विभाग व शिक्षण विभाग समरसतेने  कार्यतत्पर झाले आणि सीएमपी  प्रणाली यशस्वी केेेली.   तद्नंतर सीईओंनी स्वतः दररोज या कार्याचा आढावाही  घेतला.  सीईओं , शिक्षणाधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या योग्य भूमिकेमुळे  आणि 'आस ' च्या पाठपुराव्यामुळे सीएमपी प्रणालीद्वारेच वेतन होत असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य शिक्षकांतून येत आहे.

 त्यामुळे  दि.२२ एपिल २०२२ रोजीच्या निवेेेनाद्वारे मांडलेली  जी आंदोलनाची भूमिका होती. ती आंंदोलनाची भूमिका तूर्त रद्द केली असल्याचे प्रांताध्यक्ष युवराज पोवाडे यांनी एका निवेदनाद्वारे शासन व प्रशासनास कळविलेले आहे. यावेळी धोंडीबा हिंगमिरे, सुधाकर गायकवाड, सत्यजित चौहान,संजय सोनकांबळे, उमेश अंबुलगेकर, कैलास धुतराज , परमेश्वर  गिते व मारोती बोईनवाड  आदी 'आस' चे पदाधिकारी उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी