नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत महापौर जयश्री पावडे,मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सभापती स्थायी समिती किशोर स्वामी ,ऊप महापौर अब्दुल गफार यांच्या मार्गदर्शनाखाली शगुन सिटी कौठा मधील जवळपास विस मालमत्ता धारकाकडुन मालमत्ता कर वसूल करण्यात आली असून अनेक मालमत्ता धारकांच्ये प्रलंबित नाव परिवर्तन, नविन नंबर प्रत्यक्ष करून देण्यात आले.
नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नव्याने झालेल्या शगुन सिटी कौठा अंतर्गत असलेल्या या वसाहतीतील अनेक मालमत्ता धारकांच्ये मालमत्ता कर व नाव परिवर्तन, नविन नंबर देणे प्रलंबित होते,या प्रकरणी मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त उपायुक्त गिरीश कदम यांच्या आदेशानुसार सिडको क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त डॉ. रईसोधदीन यांनी प्रशासन आपल्या दारी ऊपकम अंतर्गत प्रत्यक्ष शगुन सिटी कौठा मधील मालमत्ता धारक यांच्यी भेट घेऊन सविस्तर माहिती घेतली,व प्रलंबित मालमत्ता कर व नाव परिवर्तन संचिका प्रकरणी त्रुटी काढून थकित बाकी असलेला मालमत्ता कर प्रत्यक्ष वसुल केला या वेळी परिसरातील काही मालमत्ता धारकांनी जवळपास ५६ हजार ८८ रुपये मालमत्ता कर पोटी व नविन नोंदणी पोटी ५२ हजार ५०० अशी एकूण १ लाख आठ हजार सहाशे तिनं वसुली केली असून उर्वरित अनेक मालमत्ता धारक हे मालमत्ता कर भरणार आहेत.
यावेळी कार्यालय अधीक्षक विलास गजभारे,कर निरीक्षक सुधीर बैस, लिपीक मारोती सांरग, कर्मचारी प्रभु गिराम, नरसिंह कुलकर्णी यांच्या सह परिसरातील डॉ.किरण खेराटकर, अँड.बळवंत पवार, डॉ.सचिन सिंगल, नंदकिशोर अडकटलवार ,विवेक कळसकर, चंद्रकांत येरावार,कल्याण जाहगिरदार,रवि पाटील खतगावकर, मोतीलाल जांगीड, यांनी या ऊपक्रमाला सहभाग नोंदविला तर इतर सभासद यांनी सहकार्य केले व कागदपत्रे पुरतता केली. मनपा प्रशासन आपल्या दारी उपक्रमात मालमत्ता कर वसुलीला प्राधान्य मिळाले तर मालमत्ता धारकांना दिलासा मिळाला.