सिडको येथील श्री भगवान बालाजीच्या ३२ वा वार्षिक ब्रम्होत्सव निमित्ताने भागवत कथा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन -NNL


नवीन नांदेड।
सिडको येथील श्री भगवान बालाजींचा ३२ वा वार्षिक ब्रम्होत्सव निमित्ताने १ ते ९ जुंन दरम्यान होम, हवन विधी व श्रीमद भागवत कथा पारायण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त मंडळ यांनी केले आहे. 

प्रति वर्षाप्रमाणे या वर्षीही भगवान बालाजींचा ब्रम्होत्सव जेष्ठ शु.२ दि. १ ते ९ जुंन २२ पर्यंत संपन्न होत आहे. दि. ४ ते ९ जुंन २२ या कालावधीत आचार्य पंडीत सतीश गुरु सिडको व मंदिर पुजारी दिव्यांशु महाराज यांचे आचार्य तत्वाने विधी पूर्वक संपन्न होत आहे. सकाळी अभिषेक होम हवण होईल. दि. १ ते दि.९ जुंन २२ रोज दुपारी १ ते ४ पर्यंत. ह.भ.प. भागवताचार्य अनिल महाराज माजलगांवकर यांचे अधीपत्याखाली श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. 

दि. ८ जुंन २२ रोजी सायंकाळी ७-१५ वाजता श्री भगवान बालाजी व लक्ष्मी पद्मावती उत्सव मुर्तीची भव्य मिरवणुक मंगल गिरी वाहानातुन मंदिरापासून मेन रोड संभाजी चौक, एन.डी. ४१ मार्गे मंदिराकडे येणार आहे. मिरवणुकी सोबत महिला व पुरुष भजनी मंडळ राहाणार आहेत. रात्री ९ वाजता कल्याण उत्सव श्री भगवान बालाजी लक्ष्मी पद्मावती लग्न सोहळा पार पडणार आहे. दि. ९जुंन रोजी सकाळी महाअभिषेक आरती तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा व नंतर होम हवण पुर्णाहोती ब्राम्हण सन्मान महा आशिर्वाद सकाळी ११-३० ते १-३० काल्याचे किर्तन ह.भ.प. अनिल महाराज मांजलगावकर यांचे होईल. 

काल्याचे किर्तनानंतर महाप्रसाद भंडारा होईल,या सोहळ्यात तबला वादक म्हणून बाळु महाराज भोसीकर पेटीवादक घनश्याम गिरी, टाळवादक विष्णु गिरी यांच्यासह भजनी मंडळ सहभागी होणार असून भागवत कथा यजमान म्हणून रामचंद्र शंकरराव कोटलवार,रवि लक्षमण कोटलवार हे आहेत. ८ जुनं रोजी सायंकाळी सात वाजता मंगलगिरी वाहनातून व्यंकटेश भगवान, लक्ष्मी पद्मावती सहित मिरवणूक मंदिर पासुन संभाजी चौक एन.डी.४ मार्ग मंदीर पर्यंत येईल व सायंकाळी ९ वाजता कल्याण उत्सव होणार आहे. ब्रम्होत्सव व भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन  विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तुकाराम नांदेडकर, कोषाध्यक्ष बाबुराव बिरादार, सचिव व्यंकट हाडोळे  व विश्वस्त मंडळ भगवान बालाजी मंदिर यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी