नायगांव, दिगंबर मुदखेडे। नायगाव तालुक्यातील नामांकित राजकीय व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेले कॉंग्रेस चे जेष्ठ नेते माजी जेष्ठ नेते कै. लक्ष्मणराव हस्सेकर यांचे व्याही तथा नांदेडजिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील टाकळीकर यांचे आज नांदेड येथील खाजगी रुग्णालयात ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या 75 व्या वर्षी प्राण ज्योत मावळलयाची बातमी समजताच जिल्ह्यातील राजकिय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ख्याती होती. टाकळीकर यांनी नायगाव तालुक्यातील बरबडा टाकळी या छोट्याशा गावातून कसलेही राजकिय वरदहस्त नसताना जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसशी एकनिष्ठ राहून आपली एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली होती. ते गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, चेअरमन नायगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष व दोन वेळा बरबडा जिल्हापरिषद गटातून जिल्हापरिषद सदस्य म्हणून कारकीर्द गाजवली याच कालावधीत ते 2005 ते 2007 च्या दरम्यान नांदेड जिल्हापरिषदेचे अध्यक्ष म्हणून ही काम पाहिले.
जिल्ह्यातील नामांकित शासकीय कंत्राटदार म्हणून ही ते सर्वपरिचित होते. त्यांच्या वागण्यात व जगण्यात कसलाही श्रीमंतीचा बडेजाव दिसून आला नाही हे विशेष होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेस सह जिल्हाभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दि 7 मे रोज शनिवारी सायंकाळी ठीक 06:00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नायगाव तालुक्यासह जिल्हा भरातील राजकीय मंडळी यांची मोठी गर्दी होती.