नृसिंह जयंती निमित्त अखंड हरीनाम सप्ताह व जयंती सोहळा आयोजन -NNL


नविन नांदेड।
दरवर्षी प्रमाणे या वर्षी नरोबा मंदिर देवस्थान जुना कौठा, नांदेड येथे ८ ते १५ मे दरम्यान नरसिंह जयंती निमित्त अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले असून १५ मे रोजी हभप परमेश्वर कंधारकर यांच्ये काल्याचे किर्तन व  देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे यांच्या कडुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

अखंड हारिनाम सप्ताह निमित्ताने  काकड आरती, अभिषेक, पारायण, गाथा भजन, हरिपाठ व  हरी कीर्तन होईल.सप्ताहा मध्ये ८  मे रोजी रात्री ह.भ.प. पंढरी महाराज मुरकुटे, ९ मे रोजी - मधुसूदन महाराज कापसीकर, १० रोजी मे रोजी-शंकर महाराज लोंढे, ११मे रोजी-अशोक महाराज आळंदीकर,१२ मे रोजी-परमेश्वर गुरुजी कंधारकर ,१३ मे रोजी-एकनाथ महाराज हरसदकर,१४  मे रोजी-कृष्णा महाराज पंढरपुर यांच्ये किर्तन होणार असुन, १५ मे रोजी  नृसिंह जयंती निमित्ताने दुपारी १२  वाजता काल्याचे कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

 अखंड हारिनाम सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन नरोबा मंदिर अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे , मंदिर संस्थानचे पदाधिकारी व पुजारी व्यंकटेश गुरू, देविदास डुबुकवाड  यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी