पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे अनुषंगाने जिल्हा शिवसेनेची बैठक संपन्न
नांदेड। शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे येत्या आठवड्यात नांदेड दौऱ्यावर येत असून या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा शिवसेनेच्या वतीने जोरदार पूर्वतयारी सुरू आहे . या दौऱ्याच्या अनुषंगाने आज सौ. राजश्री हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा शिवसेनेची बैठक घेण्यात आली .
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिनांक 14 मे रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत .या दौऱ्यात गोदावरी अर्बन बँकेच्या मुख्य शाखेच्या मुख्य इमारतीचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे. तर दिनांक 10 मे रोजी राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेही नांदेड दौऱ्यावर येत आहेत .
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वाडी बुद्रुक येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडेल शिवाय नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने आज दिनांक 7 मे रोजी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात सौ राजश्री हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा शिवसेना महिला आघाडी युवासेना आजी-माजी पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली .
या बैठकीस माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण,जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे , सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार, डॉक्टर मनोज भंडारी,भुजंग पाटील, महिला आघाडीच्या निकिता बी चव्हाण, शहर प्रमुख सचिन किसवे, उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, पप्पू जाधव, युवा सेना प्रदेश सहसचिव माधव पावडे, महेश जाधव, जयवंत कदम, युवा सेना जिल्हाधिकारी बालाजी शिंदे,गजानन कदम, माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख, नागनाथराव लोखंडे ,बाळासाहेब पाटील कराळे , शहर प्रमुख तुळशी यादव ,जिल्हा संघटक शंकर पाटील लुटे ,दत्तात्रेय पडलवार ,शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव मोरे, दयाल गिरी, सुरेश पाटील हिलाल, परमेश्वर पांचाळ, बालाजी पाटील शिंदे, मुकुंद जवळगावकर ,उपजिल्हाप्रमुख बालाजी कल्याणकर ,गंगाधर बडूरे, संतोष भरसावडे,बळवंत तेलंग व्यंकटराव ठोके, सुरेश लाड ,शिवाजी पाटील गाढे, निकिता शहरपुरवड, सरदार अवतार गिल पहरेदार, शेषराव पाटील दिघे, महेश शिवाजी शिंदे, सचिन माने ,सचिन चंद्र ,अशोक पावडे, सुरेश पावडे ,दिलीप बेंडाळे, कविता वानखेडे, मंगल वानखेडे, मुन्ना राठोड, गजानन कराडे, , विजय यादव, दीपक देशमुख, सुरज डांगे, गणेश पवार ,विठ्ठल पाटील चिंचाळकर ,गब्बू पाटील ,अभिजीत भातखंडे ,योगेश मुंडे ,निखिल भोकरे , नारायण कदम, सूर्यकांत पाटील नागणीकर, बालाजी घोगरे ,नागोराव घोगरे ,संभाजी पावडे, दौलत पाटील, आदित्य मनवार, सूर्यकांत गायकवाड, पंडित गजभारे, संतोष देशमुख यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते युवासेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या.