सिडको परिसरातील मुख्य नाल्यांच्या बांधकामाच्या आ. हंबर्डे यांच्या हस्ते शुभारंभ -NNL


नविन नांदेड।
गेली अनेक वर्ष सिडको - हडको भागातील विकास कामे थंडावली होती. परंतु महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने सिडको हडको भागातील विकास कामे झपाटयाने सुरु झाली असुन सिडको परिसरातील मुख्य व मोठा असलेल्या नाला बांधकाम शुभारंभ आ.मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आला.

पंचवीस वर्षा पासून सिडको परिसरातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ असलेले शिवलिंगेश्वर मंदिरा समोरील रस्ता व मोठ्या नालीचा प्रश्न नांदेड दक्षिण चे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या माध्यमाने ना. अशोकराव चव्हाण यांच्याकडे सतत पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला व येथिल स्थानिक नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून वचनपूर्ती  प्राप्त केली.

कारण शिव मंदिर परिसर हा धार्मिक, शैक्षणीक, परिसर असल्या कारणाने नेहमी येथे सर्व सामान्य नागरिकांची व विद्यार्थ्यांची सदरील रस्त्यांवर येण्या - जाण्या ची संख्या अधिक असल्या कारणाने हा रस्ता व नाला अपूर्ण होता आणि या रस्त्याचा व अपुऱ्या नाली मुळे सर्वसामान्य नागरिकांना व विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा फार त्रास होत होता. परंतु नांदेड दक्षिण चे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या विशेष पाठपुराव्याने येथील नागरिकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्याकडे सतत पाठपुरावा केला.

ना. अशोकराव चव्हाण यांनी सिडको - हडको भागाच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणात भरीव निधी उपलब्ध करून दिला. येत्या काळात सिडको-हडको परिसराचा विकास नामदार अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमाने झपाट्याने होत आहे, त्याच प्रमाणे नांदेड दक्षिण चे आमदार मोहन अण्णा हंबर्डे,  सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी चे पक्ष प्रभारी ॲड. संतोष पांडागळे, सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष विनोद कांचनगिरे, यांचे शिवमंदिर परिसरातील नागरिकांनी सदरील महत्त्वाचा प्रश्न सोडल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

आज दिनांक ११ मे २२ रोजी  नांदेड दक्षिण चे आमदार मोहनअण्णा हंबर्डे, यांच्या सह सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष विनोद कांचनगिरे, विश्वनाथ शिंदे, देविदास कदम, नामदेव पदमने, शेख असलम, राजू लांडगे, भि. ना. गायकवाड, आहात खान पठाण, डॉ. नरेश रायेवार, संजय कदम, काशीनाथ गरड, भुजंग स्वामी, संतोष कांचनगिरे, प्रा.गजानन मोरे, प्रभू उरूडवड, संदीप कदम, 

भगवान जोगदंड, प्रल्हाद गव्हाणे, शंकरराव धिरडीकर, प्रा.शशीकांत हाटकर यांच्या सह येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, विध्यार्थी, व स्थानीक नागरिकांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी नावामनपाचे कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी व तारू यांच्यी उपस्थिती होती.सदरील काम हे मुलभूत सुविधा अंतर्गत निधीतून होणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी