रिकाम्या प्लॉट मध्ये ठेवलेल्या लाकडांची पेट घेतल्या मुळे आगीत तिनं घरांचे नुकसान -NNL


नवीन नांदेड।
हडको परिसरातील राम मंदिर जवळ रिकाम्या प्लॉट मध्ये ठेवलेल्या लाकडांनी अचानक पेट घेतल्या मुळे बाजूला असलेल्या तीन घरापर्यंत आगीचे डोम उसळल्याने तिन्ही घरांचे नुकसान झाले असून,  तात्काळ औद्योगिक वसाहतीतील कार्यरत असलेल्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग विजविण्यात आली, या घटनेमुळे परिसरातील नागरीकात खळबळ उडाली.

दि 12 मे रोजी 12 वाजताच्या सुमारास हडको येथील राम मंदिर जवळील रिकाम्या प्लॉट मध्ये ठेवलेल्या लाकडांनी पेट घेतल्याने व हवा  जोरात असल्याने हि आग जवळ असलेल्या घरात पसरणार तोच तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी ती आग विजवली तो पर्यंत त्या घरांवर असलेल्या पाण्याच्या टाक्या व बाहेरून केलेली पाईपलाईन जळून खाक झाली व बरेच नुकसान झाले.

घटनास्थळी एम. आय. डी .सी अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन विमोचक ए.एस देशमुख,चालक टी. जी. करडे व अग्निशमन विमोचक  जी एन ढगे, व्ही.ए.मुटकुळे, के.एच.नांगरे.व टीमने आग विजवली, यावेळी ग्रामीण चे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनीही घटनास्थळी भेट देऊन योग्य त्या सुचनाही दिल्या. या लागलेल्या अचानक आगी मुळे परिसरातील नागरीकांत खळबळ उडाली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी