उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर ता.कंधार येथील पठाण कुटुंब अनेक वर्षांपासून व्यापार करत करत ते समाजकार्यात आग्रेस राहून राष्ट्रीय पक्षाकडून पं.स.व जि.प.सदस्य म्हणून निवडून येऊन गोरगरिबांची सेवा केली.आता (तिसऱ्या पिडीला) सैफ अजमत खान पठाण याने नुकतीच वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसची पदवी प्राप्त करून डॉक्टरच्या माध्यमातून गोरगरीबांची सेवा करण्याची संधी पठाण कुटुंबाला पुन्हा मिळाल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.
उस्माननगर ता.कंधार येथील कै.इब्राहिमखांन पठाण हे परिसरात मिरचीचे व कापड दुकानांचे व्यापारी म्हणून प्रसिध्द होते.त्यांचे चिरंजीव रशिद खान पठाण ( यांच्या पत्नी प.स.सदस्या )त्यानंतर लतिफखान पठाण ( जि. प. सदस्य ) रशिद खान पठाण ( ग्रा.पं.सदस्य) अमजदखान पठाण हे पत्रकार म्हणून गावातील गोरगरीबांच्या सेवा आपापल्या परीने प्रयत्न करत आले.कोणाला न कोणाला कोणत्या माध्यमातून मदतीला धावून गेले.
पठाण कुटुंब लहान पणापासून शैक्षणिक वातावरणापासून ते सामाजिक , राजकीय क्षेत्रात उत्तूंग भरारी घेतलेले घराणे म्हणून ओळखले जाते. अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि कुटुंबांची प्रेरणा घेऊन सैफखांन अजमदखान पठाण याने पठाण कुटुंबात डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे.नुकताच लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पदवीप्रदान समारंभात सैफखांन पठाण यास पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अतिशय जिद्द, चिकाटी आणि परिश्रमातून या कुटूंबाने यश संपादन केले आहे.त्याच्या यशाबद्दल आई वडील, काका, काकू, भाऊ,बहीणी, मामा मामी,सगे सोयरे, मित्र मंडळ वर्ग शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.