नविन नांदेड| परिचारिकांचे खाजगीकरण बंद करा, प्रशासकीय बदली धोरण रद्द करा ,केंद्रा प्रमाणे वेतन लागू करावा ,जुनी पेंशन लागू करावी, जोखीम भत्ता लागू करावा. या प्रमुख मागणीसाठी राज्यव्यापी परिचारिका आंदोलनला नांदेड येथील शासकीय रुग्णालयाचा परिचारिका यांनी सहभाग नोंदविला असून शासनाने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अन्यथा २८ मे पासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
2६ मे पासून राज्यव्यापी परिचारिका आंदोलनास सुरूवात झाली असून विविध मागण्या प्रलंबित मागण्या बाबत वेळा वेळी आंदोलन, निवेदनाद्वारे मागणी करून ही मागणी मान्य न झाल्याने २६ व २७ मे रोजी परिचारिका संघटनेचे वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला,व आंदोलन सुरूवात २६ मे रोजी शासकीय रुग्णालया परिसरात आंदोलनास सुरू झाली.
या आंदोलना मुळे रूग्न सेवा विस्कळित झाली असून प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा संपामुळे रूंग्न सेवांवर परिणाम होण्याची शक्यता असुन तात्काळ प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी अध्यक्षा श्रीमती ममता उईके ,सचिव केशव जिंकलवाड, खजिनदार रवि शिसोदे, उपाध्यक्ष सुनिता शिंदे,विलास कनसटवाड, सल्लागार ज्योती देशमुख, कार्याध्यक्ष बाळासाहेब मोरे, सहसचिव राम पाळवदे, सहसचिव ऊतम खुडे,संघटक अर्चना मुगल, ज्ञानेशवर देशमुख, गिरीराज पारोडवाड, सदस्य, बाळासाहेब भालेराव,सतिश करे,सिटवन साने,अमोल केंद्रे,अमोल जटाळे,संदीप वाघे, अरविंद बोरूडे,आंंनद लाडेकर, यांच्या सह परिचारिका यांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग होता.