नविन नांदेड| सिडको परिसरातील डॉ.देवानंद जाजु यांच्या मृत्यू हदयविकाराने झाला असून त्याचा पार्थिव देहावर सिडको स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी , व्यापारी यांच्या सह परिवारातील सदस्य ऊपसिथीत होते, यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
रूग्नालय लगत असलेल्या बालाजी मेडिकल चे चालक प्रमोद पांडुरंग पातावर यांनी फिर्यादीत हे २५ मे रोजी सकाळी १०चा सुमारास दवाखान्यात पेशंट आल्याने भाजपा डॉक्टर आघाडीच्ये डॉ.देवानंद जाजु यांना भम्रधवनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नसल्याने शिवाजी चौक पोलिस चौकी येथील कर्तव्यावर हजार असलेल्या अंमलदार व इतरांच्या मदतीने दार तोडून पाहिले असता डॉ.जाजू हे निवासस्थानी बेडरूम मध्ये पंलगावर उघड्या मयत स्थितीत दिसुन आले यावरून आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली,या नंतर पोलीस निरीक्षक लक्षमण राख यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले व मृतदेह शवविच्छेदन साठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
डॉ.जाजु हे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना व मित्र परिवार यांनी कुटुंबीयांना दिल्या नंतर पत्नी माजी नगरसेविका डॉ.सुरेखा जाजु व दोन मुली व भाऊ ,पुतणे हे रात्री उशिरापर्यंत सिडको येथील निवासस्थानी दाखल झाले, सकाळी दहा वाजता शवविच्छेदन झाल्या नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला,शवविच्छेदन अहवाल हा हदयविकाराने झाला असल्याचा प्राथमिक तपास अहवाल संबंधित डॉक्टर यांनी दिल्या मुळे त्याचा मृत्यू हा हदयविकाराने झाला आहे आशी माहिती तपासिक अंमलदार शेख जावेद यांनी दिली आहे.
सिडको येथील निवासस्थान परिसरातुन अंत्यविधी सिडको स्मशानभूमी मध्ये दि.२६ मे रोजी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपा सदस्य दिलीप कंदकुर्ते, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे,भाजपा प्रवक्ते जनार्दन ठाकूर,भाजपा सरचिटणीस संतोष वर्मा,भाजपा मंडळ सिडको अध्यक्ष वैजनाथ देशमुख, माजी होमगार्ड जिल्हा समादेशक किशोर देशमुख, माजी नगरसेवक संजय इंगेवाड,संदीप पाटील चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, डॉ.नरेश रायेवार, डॉ.महाजन, डॉ.गिरीश मिसाळ, डॉ.जाधव, डॉ.शिवणकर, डॉ.जाधव, डॉ.पदमणे, डॉ.भोग, डॉ.पाटील, डॉ.जयसवाल, डॉ.बयास, डॉ.पदमवार, ज्ञानेशवर चिंतोरे,अनमोल पाटणी,अतुल धानोरकर,अमोल धानोरकर, यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी व कार्यकर्ते , परिवारातील सदस्य व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, यावेळी शोकसभा घेऊन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.