नांदेड। अत्यंत खडतर असलेल्या चारधाम यात्रेत धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथून निघालेल्या पंचेचाळीस यात्रेकरूंचे यमुनोत्री व गंगोत्री हे दोन धाम पूर्ण झाले असून शनिवारी केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी गुप्तकाशी येथे सुखरूप पोहोचले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलीप ठाकूर यांनी दिली.
नांदेड ते दिल्ली रेल्वे प्रवास संपल्यानंतर तीन वाहनाद्वारे दिल्ली येथून यात्रेला सुरुवात झाली.या जत्थ्यामध्ये जि प सभापती सुशीला बेटमोगरेकर, अखिल भारतीय राजपूत महासंघ महिला प्रदेशाध्यक्ष सुषमा ठाकूर, माजी सभापती सरोजा शेळगावकर, कार्यकारी अभियंता अरविंद चौधरी, नायब तहसीलदार नरसिंह ठाकुर, उप अभियंता श्रीकान्त झाडे, मुख्याध्यापक सुरेश जाधव, अशोक भोसले व कुसुम जांभळे, जयश्री चव्हाण, शीला पवार, सोनिया पाटील ,विजयमाला चव्हाण, नंदिनी बेळगे, वंदना चव्हाण, कल्पना पोमदे, जयश्री पाटील, हेमलता शहाणे, कविता चव्हाण, सुंदर बोचकरी, नंदा कदम, इंदु बेटमोगरेकर, जयश्री पाटील, शीला खाकरे, जयश्री झाडे, संध्या पाटील,लक्ष्मी बस्वदे, राधा पाटील, कोंडाबाई पतंगे विजया जाधव, मीना जोशी, अंजली चौधरी सुनंदा व त्र्यंबक लोंढे, मीरा चव्हाण शोभा जाधव चित्रा चव्हाण यांचा समावेश आहे समावेश आहे. सर्वात जास्त 68 वय असणारे अनिल जोशी व त्यांचा नातू श्रेयस गुर्जर सर्वात कमी तेरा वर्षाचा आहे.
हरिद्वार येथील जगप्रसिद्ध गंगेच्या आरती मध्ये सर्वांनी सहभाग घेतला. चामुंडा देवी ला जात असताना उडन खटोला चा वापर करण्यात आला. उंच उंच पर्वत एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला खोल दरीत खोल दरीत वाहत असणाऱ्या नद्यांचे निसर्गरम्य दृश्य पाहत असताना सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यमुनोत्री येथील पाच किलोमीटर अंतराचा अवघड चढ १४ जणांनी डोली द्वारे तर इतरांनी घोड्यावरुन पूर्ण केला. गंगोत्री व यमुनोत्री येथील गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये सर्वांनी मनसोक्त स्नान केले. महाराष्ट्रीयन केटरिंग टीम सोबत असल्यामुळे जागोजागी उत्तम जेवण मिळाले. १४ दिवसाचा प्रवास पूर्ण करून सर्व यात्रेकरू तीन जून रोजी नांदेडला परतणार आहेत.


