जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी शासकीय गोदामाची केली पाहणी
उस्माननगर, माणिक भिसे। बारुळ येथील शासकीय गोदामाची अंत्यत दुरवस्था झाल्याने धान्याची नासाडी होत असल्याचे लक्षात घेऊन नांदेडचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी भेट देऊन गोदामांची पाहणी करून नवीन शासकीय गोदाम चालू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
बारूळ येथील शासकीय धान्य गोदामाची मागील अनेक वर्षापासून दुरावस्था झाली होती. त्यामुळे पावसाळ्यात गोदामातील धान्य त्यावर ताडपत्री टाकण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांना धावपळ व कसरत करावी लागत होती तसेच धान्य नेण्यासाठी गोदामा पर्यंत रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे अनेक वाहने रस्त्यात दोन ते तीन दिवस उभे राहुन फसत होते त्यामुळे धान्य नासाडी ही मोठ्या प्रमाणात या गोदामात होत होती साठ वर्षानंतर येथील दुरवस्था झालेल्या गोदामाला पाडून चारपट क्षमता असलेल्या गोदामाचे नवीन काम चालू करण्यात आले.
त्यामुळे या गोदामा वरील पन्नास गावातील 68 स्वस्त धान्य दुकानदार तसेच या अंतर्गत 17 हजार 765 कार्डधारकाचा धान्याची नासाडी तसेच धान्य नासाडी याची होण्याचा प्रश्न मिटला आहे मागील एक वर्षाच्या पासून येथील नवीन गोदामाचे काम चालू झाले होते मागील साकोसा खाली बांधकाम करण्यात आलेले गोदामाचे दुरवस्था झालेल्या पाचशे मेट्रिक टन गोदामाचे बांधकाम ते पाडून आता नवीन अठराशे मेट्रिक टन क्षमतेचे असणारे गोदाम बांधकाम करण्यात आले.
यासोबतच नवीन चार गोदाम बांधकाम करण्यात आले तात्पुरत्या स्वरूपात मागील एक वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर पेठवडज इथून शासकीय धान्य गोदाम स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य पुरवठा करण्यात येत होते परंतु हे धान्य वाटप करताना अनेक अडचणी कर्मचाऱ्यांना व कामगारांना तसेच स्वस्त धान्य दुकानदारांना होत होत्या त्यासोबतच कार्डधारकांना ही वेळेवर धान्य मिळत नव्हते या सर्व येत्या काही दिवसा वरच या नुतून नवीन शासकीय गोदामाचे उद्घाटन होणार आहे ही शासकीय गोदाम चालू करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन, उपविभागीय अधिकारी तहसीलदार तुकाराम मुंढे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जोशी गुत्तेदार पवार गोदामपाल जाधव यासह विविध महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यावेळी येथील गोदामाला भेट देऊन पाहणी केली त्यामुळे पावसाळ्यापूर्वी येथील नूतन शासकीय धान्य गोदामात चालू होण्याचे मार्ग दिसून येत आहे त्यामुळे पन्नास गावातील 68 स्वस्त धान्य दुकानदार यांचे लवकरच प्रश्न मार्गी लागतील असे चित्र दिसून येत आहे.