मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी वाडी बु. येथील 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा घेतला आढावा -NNL

आ. बालाजी कल्याणकर यांनी विविध विषयांवर केली चर्चा


नांदेड,आनंदा बोकारे।
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शनिवारी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्याकडून वाडी बु. येथील 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी लवकरात - लवकर उपजिल्हा रुग्णालय जनसामान्याच्या सेवेत सुरू झाले पाहिजे, असे आ. कल्याणकर यांना सांगितले आहे. जर  काही अडचण असेल तर ती मी सोडवण्यास तयार आहे. यांवेळी आ. कल्याणकर यांनी मुख्यमंत्र्यांशी विविध विषयांवर चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील आठवड्यात राज्याचे पर्यटन मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते वाडी बु. येथील उपजिल्हा रुग्णालयाचे मोठ्या थाटात भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना आदित्यजी ठाकरे यांनी सहा महिन्याला या रुग्णालयाचा आढावा, मी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्याकडून वाडी बु. येथील 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाचा नकाशा, इमारतीचे फोटो आणि भूमिपूजन कार्यक्रमाबद्दल देखील माहिती दिली आहे.

तसेच आ. बालाजी कल्याणकर यांनी विविध विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी देखील आ. कल्याणकर यांना हे उपजिल्हा रुग्णालय लवकरात लवकर सर्वसामान्यांच्या सेवेत सुरू झाले पाहिजे, असे सांगितले आहे. त्यामुळे वाडी बु. येथील उपजिल्हा रुग्णालय लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत सुरु होणार असल्याचे दिसत आहे. तसेच यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी नांदेड उत्तर मतदारसंघातील विकास कामांबाबत देखील आ. बालाजी कल्याणकर यांच्याकडून आढावा घेतला आहे. मतदारसंघात जी विकास कामे हवी आहेत. त्यासाठी थेट माझ्याशी संपर्क साधून ती करून घ्या. जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न तात्काळ सोडवा असे देखील आ. बालाजी कल्याणकर यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

आ. बालाजी कल्याणकर यांना थेट मुख्यमंत्री कार्यालयातून फोन

आ. बालाजी कल्याणकर हे मतदार संघातील प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होत असतात. त्याबरोबरच ते मतदारसंघातच थांबून अडीअडचणी सोडवत असतात. मुंबईत ज्यावेळी काम आहे, तेव्हाच ते थांबतात. अन्यथा ते मतदारसंघातच तळ ठोकून असतात. त्यामुळे शुक्रवारी दुपारी थेट मुख्यमंत्री कार्यालयातूनच आ. बालाजी कल्याणकर यांना तात्काळ मुंबईत येण्याचा फोन आला, तेव्हा आ. बालाजी कल्याणकर घाईघाई मुंबई ला गेले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी