शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकार्यांनी योग्य पद्धतीने नियोजन करून काम करावे, अशा सूचना नांदेड पक्ष निरीक्षक सौ. आशाताई भिसे यांनी नांदेड येथे दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक दि. 21 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्यालय कदम हॉस्पिटल येथे आयोजित केली होती, यावेळी सौ. भिसे बोलत होत्या. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. पक्ष निरीक्षक भिसे यांनी महानगरपालिका क्षेत्राचा बुथनिहाय आढावा घेतला. तसेच विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या जागा येतात त्याचा पण त्यांनी आढावा घेतला. आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी योग्य पद्धतीने नियोजन करून काम करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली तयारी सांगितली. याहून अधिक बुथनिहाय नियोजन झाल्याचे त्यांनी सांगून निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी मत मांडले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, पक्ष निरीक्षक आशाताई भिसे, गणेश तादलापूरकर, सिंधुताई देशमुख, सय्यद मौला, उत्तमराव आलेगावकर, धनंजय सूर्यवंशी, रऊफ जमीनदार, श्रीधर नागापूरकर, अमरदीपकौर, गजानन कल्याणकर, दत्ता पाटील तळणीकर, कन्हैय्या कदम, गोविंद यादव, युनूस खान, शफी उलरहेमान, महेश्वरी गायकवाड, राजू हातवळणे, भारत कांबळे, कैलास गायकवाड, गुलाम मुबीन, प्रकाश घोगरे, ज्ञानेश्वर चिद्रवार, माधव धोत्रे, पाशा तांबोळी, निखील नाईक, राहूल जाधव, प्रमोद नरवाडे, पंकज कांबळे, प्रभाकर भालेराव, सय्यद राजूरकर, हासिना बेगम, साधना गायकवाड, प्रा. रमेश मोरे, एकनाथ वाघमारे, मारोती चिंचाळकर, प्रवीण घुले, जिलानी पटेल, महुमदी पटेल, सईदा पटेल, प्रसाद पवार, रहेमत अलीखान आदींची उपस्थिती होती.