केंद्र सरकारचा मोठा दिलासा,पेट्रोल आणि डिझेल स्वस्त
नवी दिल्ली। इंधनाच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जाळ लागला होता. मात्र आता केंद्र सरकारने इंधन दरवाढीने पिचलेल्या सर्वसामांन्यांना मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल-डीझेलचे दर काही रुपयांनी कमी करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
डीझेल 7 तर पेट्रोल 9 रुपये 50 पैशांनी स्वस्त झालं आहे. केंद्रीय अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल -डीझेलचे दर स्वस्त झाले आहेत. तसेच उज्जवला गॅस योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सिलेंडरचे दरही 200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी याबाबतची माहिती दिली.
राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष-केंद्र सरकारने इंधनाचे दर स्वस्त केले आहेत. यानंतर आता सर्वसामांन्याचं राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. केंद्रापाठोपाठ राज्य सरकार उत्पादन शुल्क आणि व्हॅटच्या दरात कपात करुन सर्वासामांन्याना दिलासा देणार का,याकडे लक्ष असणार आहे.
सीमाशुल्क देखील कमी - आमची आयात अवलंबित्व जास्त असलेल्या प्लास्टिक उत्पादनांसाठी आम्ही कच्चा माल आणि मध्यस्थांवरील सीमाशुल्क देखील कमी करत आहोत. स्टीलच्या काही कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी केले जाईल. तसेच काही स्टील उत्पादनांवर निर्यात शुल्क आकारलं जाईल", अशीही माहिती केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.