नांदेड। शहरात दि.27 मे रोज शुक्रवारी सैलानी बाबा ट्रस्टच्या वतीने सैलानी बाबा संदलचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे ट्रस्टचे अध्यक्ष रघुबाबा यांनी कळवले आहे.
मागील 34 वर्षापासून सैलानी बाबांचा संदल काढण्याची परंपरा आहे. परंतु गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थितीने खंडीत झाली. यावर्षी मात्र मोठ्या उत्साहात सदरहू संदल काढण्यात येणार आहे. यासाठी हजारो भाविक विविध धर्माचे जिल्ह्यातून, राज्यातून एवढेच नव्हे तर आंध्रप्रदेश व तेलंगणातून येतात.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आ.मोहनअण्णा हंबर्डे (नांदेड दक्षिण), आ.बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर), मा.गणपत धबाले, मा.राजुभाऊ गवारे (सामाजिक कार्यकर्ते), बबन वाघमारे, नांदेड शहर उप प्रमुख शिवसेना पप्पू जाधव, रमेशभाऊ गोडबोले (नगरसेवक प्रतिनिधी, नांदेड), बंटी लांडगे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांची उपस्थिती राहणार आहे. संदल सायंकाळी 6 वाजता गोदावरी नदी येथुन प्रारंभ होवून भीमघाट, देगावचाळ, नल्लागुट्टाचाळ, पक्कीचाळ, गंगाचाळ मार्गे मुख्य ठिकाणी सायं.9.30 वाजता पोहचेल व समारोप होईल.
सदरील कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राजु महाराज, विकास वाघमारे, मारोती सवंडकर (पत्रकार), विश्वनाथ वाघमारे, केशव नवरे, मुख्तारभाई, रफिकभाई, बिट्टू महाराज यांनी केले आहे.
सदरील कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राजु महाराज, विकास वाघमारे, मारोती सवंडकर (पत्रकार), विश्वनाथ वाघमारे, केशव नवरे, मुख्तारभाई, रफिकभाई, बिट्टू महाराज यांनी केले आहे.