हदगाव, शे चांदपाशा| नांदेड जिल्ह्यातल्या हदगांव तालुक्यातील साखर कारखान्याने साखर उतारा कमी दाखवून बील पेंमेट कमी केल्याची तक्रार तालुक्यातील गुरफळी या गावातील उसउत्पादक शेतकरी दिलीप पवार यांनी एका निवेदन द्वरे केली आहे जर माझ्या हक्काची रक्कम साखर कारखाना प्रशासनाने न दिल्यास कारखान्याच्या कार्यालय जवळ आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदन द्वरे दिला आहे.
या बाबतीत माहीती अशी शहरापासुन तीन किमी वर असलेला तालुक्यातील बहुचर्चित श्री सुभाष शुगर प्रा.लि.हडसणी ता.हदगाव जि नादेड येथे कायन्वीत आहे. उस उत्पादक दिलीप पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी उस या कारखान्यास उस .....गाळपास दिला असता त्या उसाची गुणवत्ता पाहुन सदर कारखान्याने आपल्या यंञणेद्वरे गाळपास १३ महीण्यानंतर नेण्यात आले .उसाची प्रत ३१०२ हे असुन, एकूण उसाचे वजन १७८.७०५.मेट्रिक टन वजन झालेले होते. त्याची २००० हजार रु प्रति टना प्रमाणे ३लाख ५७ हजार ४१० रु एकुण गाळप उसाची रक्कम होते. पण कारखाना प्रशासनाने माञ माझ्या बँकेच्या खात्यात केवळ १लाख ९४ हजार ९४हजार ४३१ रु माझ्या बँकेच्या खात्यात एनएफटी द्वरे जमा करण्यात आले. बाकी रक्कम केव्हा देणार आहात या बाबतीत कारखाना प्रशासनाकडे विचरणा केली तर उस उत्पादकला अपेक्षित असे उत्तर मिळत नसल्याने या बाबतीत सह.साखर संचालक (नादेड)कडे पण लिखित स्वरुपात निवेदन दिले.
पण या बाबतीत दखल घेतली नाही विशेष म्हणजे मी एक या बाबतीत अशिक्षित उसउत्पादक असल्याचा हा खाजगी कारखाना घेत आहे असा गंभीर आरोप ही निवेदनात करण्यात आला आहे सध्या खरिप हंगाम तोडावर आहे शेतीला लावलावगडीला खर्च ट्रक्टर या वाहनाचे कर्जाचे हाप्ते अश्या एकना अनेक अर्थिक समस्या असतांना एक अल्पभुधारक शेतक-याला जाणुन बुजुन श्री सुभाष शुगर प्रा. लिमिटेड चे प्रशासन ञास देत आहे जर माझ्या हक्काची गाळप झालेल्या उसाची रक्कम माझ्या बँकेच्या खात्यावर जमा न केल्यास नाइलाजाने मला दि २५ मे २०२२ रोजी कारखान्याच्या कार्यालय समोर सकाळी १०वाजेच्या दरम्यान आत्मदहन करण्याचा इशारा निवेदन द्वरे दिला आहे याच्या प्रती जिल्हाआधिकारी तहसिलदार सह साखर खार आयुक्त आदीना देण्यात आलेल्या आहेत...
श्री सुभाष शुगर प्रा.लि प्रशासनाचे स्पष्टीकरण .... या बाबतीत प्रस्तुत प्रतिनिधीने श्री .शुगर.प्रा.लि.कारखान्या प्रशासनाच्या प्रमुखाशी या बाबतीत माहीती विचारली असता त्यांनी सागितले की सदर उसउत्पादकाचा पेँमट न मिळाल्या मुळे आत्मदहनचा पञ कारखाना प्रशासनास मिळालेल नाही तरी कारखाना प्रशासनाने उर्वररित बाकी रक्कम संबंधित उसउत्पादकाच्या खात्यात जमा केले आहे अस कारखाना प्रशासना तर्फ सांगण्यात आले या मध्ये कारखान्याचे प्रशासन खोट बोलतो की उस उत्पादक ...? बाबतीत उसउत्पादकाडे माहीती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही ....!
माजी केद्रीय मंञी सुर्यकाँन्ता पाटील माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाण ते उद्योगजक सुभाष देशमुख
हदगाव व हिमायनगर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच आसलेला हा साखर कारखाना या पुर्वी माजी केद्रिय मंञी सुर्यंकांन्ता पाटील यांनी सर्वात प्रथम या कारखान्याची त्यांचे वडील हुतात्मा जयवंतराव पाटील सह साखर कारखाना म्हणुन उभारणी केली होती काही वर्षानंतर हा कारखाना कर्जरुपी डबघाईला आला होता तेव्हा हा कारखाना माजी मुख्यमंत्री व सध्याचे बाधकाम मंञी आशोक चव्हाण यांच्या भाऊराव सह कारखाना या युनिट ने खरेदी केला काही वर्षानी चालविल्या नंतर दोन वर्षापुर्वी उद्योजक सुभाष देशमुख यांनी हा कारखाना खरेदी केला आहे विशेष म्हणजे एक माजी केद्रिय मंञी व एक राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनी पण हा कारखाना वास्तविक पाहता तालुक्याच्या दृष्टीने त्यांना काहीच अडचण नव्हती जो की हा सहकारी कारखाना एका उद्योजकच्या घशात घालयच परंतु बड्या नेत्याना सांगणार कोण ....असा प्रश्न निर्माण होतो आहे ..