मुखेड, रणजित जामखेडकर। पेरणीपूर्व व पेरणी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना लागत असलेल्या खत-बियाण्यांची गरज लक्षात घेऊन,खत-बियाणे विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. आणि त्यातून चढ्या दराने खत-बियाणे विकली जातात.यासोबत बाजारात खलक्या प्रतीची व अप्रमाणित खत बियाणे मोठ्या प्रमाणात विकली जातात.हे सर्व प्रकार बंद झाले पाहिजे.
अशा खत-बियाणे विक्रेत्यावर कार्यवाही झाली पाहिजे.यासाठी पथकाची नेमणूक करा व यंत्रणा राबवा,अशी मागणी दि.१८ मे रोजी कृषी अधिकारी विशाल बिऱ्हाडे यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे.यावेळी कृषी मंडळ अधिकारी भारत नांगरे उपस्थित होते.
शेतकऱ्यांना दर्जेदार व प्रमाणित खत बियाणे उपलब्ध करून देणे व बाजारातील हलक्या व अप्रमाणित खत दर्जाच्या बियाणे विक्री करणाऱ्या संबंधित विक्रेत्यावर कार्यवाही करण्यासाठी सक्षम यंत्रणा राबवावी पाहिजे अशी मागणी शिवशंकर पा. कलंबरकर यांनी कृषी विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.