पोखरभोसी येथे बुद्ध पोर्णिमेनिमित्त धम्मज्योत मिरवणूक काढून बुद्ध जयंती साजरी-NNL


उस्माननगर।
जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पोखरभोसी ता.लोहा येथे गावातून प्रमुख मार्गाने धम्मज्योत मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात  हार्षाउल्हासात बोध्दपोर्णिमा साजरी करण्यात आली.

लोहा तालुक्यातील मौजे पोखरभोसी येथे सायंकाळी बुद्ध विहार या ठिकाणी उस्माननगर विभागीय ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे सहसचिव माणिक भिसे ,व प्रकाश विनायक कांबळे  यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्ममाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर गावातील प्रमुख मार्गाने भव्य अशी शांतता धम्मज्योत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी मोठ्या प्रमाणात महीला यांनी शुभ्र वस्त्र परिधान करून हातामध्ये मेणबत्ती घेत सहभाग नोंदवला होता.

मिरवणूक विसर्जित झाल्यानंतर पत्रकार तथा बोध्द उपासक लक्ष्मण कांबळे यांनी वंदना ,त्रिशरन, पंचशील सामूहिक ग्रहण केले, उपस्थितांना अन्नदानाचे वाटप करण्यात आले.यावेळी एकनाथ कांबळे , गोविंद भावे,दयानंद कांबळे ( पोलीस पाटील) अजय वाघमारे, नागोराव गजभारे ,संदीप कांबळे,रफिक शेख,दावल शेख, सुदर्शन कांबळे, राहुल कांबळे, रत्नाकर कांबळे यांच्या सह बोध्दवाड्यातील उपासक, उपासिका,बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी