नांदेड| देगलूर नाका येथील कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या स्मृतिदिनानिमित्त १०० सेकंद स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. बाबासाहेब भुकतरे यांनी छ. राजश्री शाहू महाराज यांच्या सामाजिक सुधारणेच्या कार्याची माहिती दिली.
प्रा. मारुती भोसले यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजनाच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच समाजातील अनिष्ट रूढी परंपरा समूळ नष्ट करण्यासाठी विविध नियम व कायदे करून सामाजिक समानता प्रस्थापित करण्याचे कार्य छ.शाहू महाराज यांनी केले या कार्यक्रमास प्राचार्य डॉ.उस्मान गणी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब भुक्तरे प्रा.भांडवलकर, प्रा. नुरी मॅडम, प्रा.पुष्पा क्षीरसागर, प्रा. स्मीता कोंडेवार,प्रा.अफरोज सर प्रा.शेख़ नजीर सर, प्रा.निसार सर,प्रा.सनोवर मॅडम, प्रा.निजामसर,मोहम्मद फराज, अक्षय हसेवाड,गौस खान यांची प्रमुख उपस्थिती होती