नांदेड| डायल 112 ही सेवा जनतेसाठी राबविण्यात येत असुन, कोणत्याही अडचणीच्या वेळी पोलीसांची मदत आवश्यक असेल तर नागरिकांनी डायल 112 वर कॉल करुन मदत घ्यावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नुकतेच दि. 04.05.2022 रोजी 13.53 वा. डायल 112 पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड येथे डायल 112 वर कॉल आला होता. डायल केलेल्या व्यक्तीने सांगितले की, पोलीस स्टेशन सोनखेड हद्दीतील पिनॉका इंन्टरनॅशनल स्कुल जवळ येथे प्रवासी बस आणी छोटा हत्ती (टाटा एस) दोन वाहना मध्ये अपघात झाला आहे. काही लोेक गंभीर जखमी आहेत. लवकर मदत पाठवा असा डायल 112 पोेलीस नियंत्रण कक्ष नांदेड येथे कॉल प्राप्त झाला.
यावेळी पोलीस नियंत्रण कक्ष येथील हजर असलेले अंमलदार पोकॉ/41 विनोद राठोड यांनी सदर कॉल प्राप्त झाल्याने तात्काळ सोनखेड येथील डायल 112 वरील कर्तव्यावर असलेले सपोनि/श्री भोसले व सपोउपनि/श्री डोईबळे यांना देण्यात आला. त्यांनी सदर कॉल अनुषंगाने माहिती मिळालेल्या ठिकाणी तात्काळ अपघाताच्या घटनास्थळी पिनॉका इंन्टरनॅशनल स्कुल जवळ जावुन अपघातात जखमी ईसमांना तात्काळ उपचारसाठी विष्णुपुरी दवाखाना येथे रवाना केले.
नागरिकांनी डायल 112 नेवर कोळ करून माहिती दिल्याने त्यांच्या कोलला तात्काळ प्रतिसाद दिला. त्यामुळे या अपघातातील जखमी व्यक्तीचे प्राण वाचले आहे. डायल 112 ही सेवा जनतेसाठी असुन, कोणत्याही अडचणीच्या वेळी पोलीसांची मदत आवश्यक असेल तर डायल 112 वर कॉल करुन मदत घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येते आहे.