नांदेड। कधी कडाक्याची थंडी तर क्षणात कोसळणारा पाऊस आणि रात्री झालेली बर्फवृष्टी अशा विलक्षण बिकट परिस्थितीत सोळा किलोमीटर चे केदारनाथचे खडतर अंतर धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या नांदेड येथील सर्व पंचेचाळीस यात्रेकरूंनी पूर्ण करून गौरीकुंड येथे सुखरूप पोहोचले. यासाठी नांदेडचे स्थायी समिती सभापती किशोर स्वामी यांच्यासह नगरसेवक आनंद चव्हाण व जिप सभापती संजय बेळगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यमुनोत्री, गंगोत्री हे दोन धाम पूर्ण केल्यानंतर गौरीकुंड येथे मुक्कामाला थांबलेल्या नांदेडच्या जत्थ्याला प्रचंड गर्दी असल्यामुळे डोली मिळत नव्हत्या. किशोर स्वामी यांनी आपल्या ओळखीचा उपयोग करून गौरीकुंड या ठिकाणचे सरपंच नरोत्तम गोस्वामी यांच्या मार्फत बावीस डोली उपलब्ध करून दिल्या. आनंद चव्हाण व संजय बेळगे, माजी आमदार हनुमंतराव बेटमोगरेकर, विजय चव्हाण हे नांदेड येथून दिलीपभाऊंच्या सारखे संपर्कात होते. सकाळी अडीच वाजता सुशीला बेटमोगरेकर, सरोजा शेळगावकर, कुसुम जांभळे, विजयमाला चव्हाण,जयश्री पाटील, चित्रा चव्हाण, नंदा कदम, जयश्री पाटील, राधा पाटील हे घोड्याने दर्शनासाठी निघाले. सकाळी सात वाजता पालखीमध्ये सुषमा व नरसिंह ठाकूर , जयश्री चव्हाण,अंजली व अरविंद चौधरी, जयश्री व श्रीकांत झाडे, कल्पना पोमदे, कविता चव्हाण, सुंदर बोचकरी,विजया व सुरेश जाधव ,नंदिनी बेळगे ,वंदना चव्हाण,लक्ष्मी बस्वदे, कोंडाबाई पतंगे,सुनंदा व त्र्यंबक लोंढे , शोभा जाधव,श्रेयस गुर्जर,मीना व अनिल जोशी,हेमलता शहाणे, शीला खाकरे,अशोक भोसले यांनी आगे कुच केली.
केदारनाथ येथे दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. किशोर स्वामी यांनी केदारनाथचे पीठाधीश शिराढोणकर महाराज यांच्या सोबत संपर्क साधला. त्यांच्या आदेशानुसार गंगाधरस्वामी यांनी दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती. घोड्यावरून गेलेले यात्रेकरू दुपारी चार वाजेपर्यंत गौरीकुंडला परतले. शीला पवार, सोनिया पाटील, मीरा चव्हाण , संध्या पाटील यांनी जातांना घोड्यावर तर येतांना पायी प्रवास केला.एक एक करत डोलीवाल्यांना परतायला रात्री दहा वाजले. केदारनाथ इथे रात्री बर्फ पडायला सुरुवात झाली असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गौरीकुंडला परत येण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा अशा सूचना दिलीप ठाकूर यांनी दिली असल्यामुळे सर्वांनी त्याचे तंतोतंत पालन केले. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसापासून प्रतिकूल हवामानामुळे केदारनाथ यात्रा बंद असताना दिलीप ठाकूर यांच्या टीम मधील सर्वांचे व्यवस्थित दर्शन झाल्यामुळे सर्व यात्रेकरू समाधानी आहेत.