पडसा येथे सामूहिक विवाह सोहळा संपन्न एकूण 303 जोडपी विवाहबद्ध -NNL

अंतरजातीय विवाहाचाहि समावेश; बौध्द 125, हिंदू 107, आंतरजातीय 71


माहुर, अश्विन शेंडे।
तालुक्यातील मौजे पडसा येथे २६ व्या बौद्ध विवाह मेळाव्यात 71 अंतरजातीय जोडप्यासह एकुन ३०३ जोडपी विवाहबद्ध झाली.रमामाता महिला मंडळ तर्फे मौजे पडसा येथे आज दि.२९ मे (रविवार) रोजी बौद्ध विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


बौद्ध विवाह मेळाव्या च्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार प्रदीप नाईक यांची उपस्थिती होती. सदर मेळाव्याचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव व युवा सेनेचे यश खराटे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी,युवा नेते कपिल नाईक, मनोज किर्तने,भीमराव भवरे,गोकुळ दास वंजारी, अनंतराव केशवे, विनोद राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी देवेंद्र मुनेश्वर,नगर सेवक प्रतिनिधि रणधीर पाटिल, माजी महापौर किशोर भवरे, प्रा.सिद्धार्थ मुनेश्र्वर, विनोद खुपसे, बंटी पाटिल जोमदे, देवेंद्र कोवे,किशोरजी भवरे,सिंदखेड चे पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके,जितेंद्र कांबळे, पडस्या चे सरपंच आनंदा किनाके,एस.एस पाटील सर, प्रा.विनोद कांबळे,प्रफुल्ल जाधव,अमोल शेंद्रे,सिद्धार्थ तामगाडगे,राहुल पुंडलीकराव भगत, याच्या सह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


मागील २६ वर्षा पासून पडसा येथे बौद्ध बांधवाचा वेळ ,पैसा, व श्रम ,यांचा अपव्यय टाळण्यासाठी ह्या बौद्ध विवाह मेळाव्याचे उपक्रम चालू आहे. याही वर्षी ही रविवार दिनांक २९ मे रोजी बौद्ध विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.आयोजक प्रकाश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नामुळे यावर्षी चा बौद्ध  विवाह मेळाव्यात अंतरजातीय ७१ ,हिंदु धर्मीय १०७ व बौद्धधर्मिय १२५ मिळून एकूण ३०३, जोडपी विवाहबद्ध झाली.पडसा येथील सर्व धर्मीय व बौध्द विवाह मेळाव्याची व्याप्ती पाहता हा आदिवासी दुर्गम भागातील सर्वात यशस्वी मेळावा असल्याचे मत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी व्यक्त केले.


विवाह मेळावा यशस्वी करण्यासाठी आयोजक प्रकाश गायकवाड यांच्या सह संयोजन समितीचे अध्यक्ष कुमार कांबळे, उपाध्यक्ष सुनील शेंडे, सचिव प्रदीप भगत, सहसचिव जितेंद्र शेंडे, निमंत्रक राहुल भवरे, संघटक विष्णू शेंडे, कोषाध्यक्ष उत्तम मुनेश्वर, सहकोषाध्यक्ष संतोष उमरे, कार्याध्यक्ष सम्यक भवरे,शशिकांत भगत,गौतम मुनेश्र्वर,मारोती कांबळे याच्या सह डॉ.सत्यम गायकवाड यांनी परिश्रम घेतले.मेळाव्याला हजाराचा जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी