सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर भोयर यांच्या संशयास्पद मृत्यूची तात्काळ चौकशी करा - आ.माधवराव पाटील -NNL

आ.माधवराव पाटील जवळगावकर यांची ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी 

परमेश्वर भोयर यांच्या मृत्यूचा तपासासाठी दि.३१ मेंचा हिमायतनगर बंद रद्द 


मुंबई,अनिल मादसवार|
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता स्व.परमेश्वर भोयर यांच्या मृत्यू बाबत अनेकातून संशय व्यक्त केला जात आहे. हि बाब लक्षात घेऊन त्यांच्या मृत्यूचे कारण शोधून काढून तात्काळ आरोपीना जेरबंद करावे अशी मागणी हदगाव- हिमायतनगर विधानसभेचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मुंबई येथे भेटून घेऊन केली आहे. त्यांनी तत्काळ निवेदनाची दखल घेऊन विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेड यांना सूचना दिल्या असून, या घटने संदर्भांव्ये योग्य ती कार्यवाही करावी अश्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले आहे.


देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, मयत परमेश्वर भोयर हे दि.२० रोजी लग्नसोहळ्याला जातो म्हणून घरातून गेले होते. रात्रीला ते घरी परत आले नाहीत, त्यामुळे घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र त्यांचा कुठेच शोध लागला नाही. दुसऱ्या दिवशी दि.२१ रोजी त्यांचा मृतदेश हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर कमानीच्या समोर असलेल्या बालाजी ट्रेडर्स या दुकानाच्या पाठीमागील चेंबरमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्यांचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला त्यावरून त्यांचा खून करून प्रेत तिथे टाकण्यात आले कि काय...? असा संशय ग्रामस्थांसह त्यांच्या मित्रमंडळींनी व्यक्त केला आहे. याबाबत हिमायतनगर पोलिसांना निवेदन देऊन घटनेचा पारदर्शक पद्धतीने तपास लावून यास कारणीभूत असलेल्या आरोपीना अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र पोलिसांचा तपास संत गतीने होत आहे. 


हिमायतनगर शहरात मागील काही काळापासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच अनेक खून, दरोडे, लूटमार चोऱ्या आदी प्रकार घडत आहेत. त्यामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हि बाब लक्षात घेता समाजायक कार्यकर्ता परमेश्वर भोयर यांच्या संशयास्पद मृत्यूचा जलद गतीने तपास हवा अशी मागणी एक निवेदन महाराष्ट्र राज्याचे ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मुंबई येथे भेटून आ.जवळगावकर यांनी देऊन केली आहे. या निवेदनाची त्यांनी दाखल घेऊन या संदर्भांवये योग्य दिशेनं व लवकरात लवकर तपस करण्यात याव्यात अश्या सूचना नांदेडच्या पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत. यामुळे तरी या घटनेचा तपास जलद गतीने आणि पारदर्शक पद्धतीने होईल काय..? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. 

परमेश्वर भोयर यांच्या मृत्यूचा तपासासाठी दि.३१ में चा हिमायतनगर बंद रद्द 
हिमायतनगर शहरासह तालुक्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. सहा महिन्यात हिमायतनगर शहरात ३ खुनाच्या घटना घडल्या असून, तालुक्यात ७ खून झाले आहेत. मात्र आत्तापर्यंत एकही घटनेचा पूर्णतः तपास लावण्यात पोलीस अधिकारी व त्यांची टीम अपयशी ठरली आहे. त्यामुळे हिमायतनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नुकतेच मयत झालेल्या परमेश्वर भोयर यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरल्यामुळे उद्या दि.३१ में रोजी हिमायतनगर बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील यांनी आज दि.३० रोजी शहरविषयांची भेट घेऊन या घटनेचा तपासासाठी हालचाली सुरु करण्यात आल्याचे सांगून यासाठी विशेष पथक गठीत करण्यात आल्याची माहिती दिली. त्यादिशेने योग्य तो तपस करून या खुनाच्या घटनेचा छडा लावण्यात येईल अशी माहिती दिल्याने. उद्या हिमायतनगर बंद तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. आतातरी या घटनेच्या तपासाला गती मिळून आरोपीना अटक होईल का..? आणि शहरात होत असलेल्या घटनांना आवर घालण्यासाठी हिमायतनगर पोलीस ठाण्याला कर्तव्यदक्ष अधिकारी लाभेल काय..? याकडे सुजाण नागरिकांचे लक्ष लागून आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी