‘सी.आय.डी.’ अहवालात बड्या लोकांचा समावेश; मात्र कोणावरही कारवाई नाही -NNL

श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड करणारा
‘सी.आय.डी.’ अहवाल ५ वर्षे दडपून भ्रष्टाचार्‍यांना अभयदान 

मुंबई। 
महाराष्ट्राची आराध्यदेवता मानल्या जाणार्‍या श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर संस्थान हे शासकीय नियंत्रणात असतांना तेथे वर्ष १९९१ ते वर्ष २००९ या कालावधीत सिंहासन दानपेटीच्या लिलावात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहेया संदर्भात हिंदु जनजागृती समितीने हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर (औरंगाबादखंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर निकाल देतांना मान्यायालयाने सदर प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीआयडीचाचौकशी अहवाल सादर करण्यास सांगितला होताया ‘सीआयडी’च्या चौकशी अहवालात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेतत्या चौकशी अहवालानुसार दानपेटी लिलावात ८ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांचा घोटाळा झालेला असूनत्यात दोषी म्हणून ९ लिलावदार५ तहसिलदार१ लेखापरिक्षक१ धार्मिक सहव्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे


तसेच त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे
मात्र हा चौकशी अहवाल २० सप्टेंबर २०१७ या दिवशी अपर मुख्य सचिवगृह विभागमहाराष्ट्र राज्य यांना सादर होऊन ५ वर्षे होत आली असलीतरी दोषींवर अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीया काळात एक आरोपी मृत झाला आहेतर घोटाळा प्रारंभ होऊन ३१ वर्षे झाली आहेतमग शासन अन्य आरोपी मृत होण्याची वाट पाहतेय कि यात दोषी ठरवलेल्या शासकीय अधिकार्‍यांना पाठीशी घालत आहे आता तरी महाराष्ट्र शासनाने गांभीर्य दाखवून तात्काळ सर्व दोषींवर एफ्आयआर् (FIR) दाखल करून त्यांना अटक करावीतसेच त्यांच्याकडून देवस्थानच्या लुटीची रक्कम चक्रवाढ व्याजासह वसूल करावीअन्यथा हिंदु जनजागृती समितीला यासाठी रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन करावे लागेलतसेच आवश्यकता भासल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेलअसा इशारा हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्रीसुनील घनवट यांनी दिला आहेत
मुंबई मराठी पत्रकार संघ ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पत्रकार परिषदेला हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य तथा याचिका लढवणारे अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी उपस्थित होते.

 
या संदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री श्रीशंभूराज देसाई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलेतसेच अपहार करणार्‍या सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीत्या वेळी गृहराज्यमंत्री म्हणाले कीया संदर्भात अधिकार्‍यांकडून अधिकची माहिती जाणून घेतोतसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो.


        श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या भ्रष्ट कारभाराच्या संदर्भात तुळजापूर पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्रीकिशोर गंगणे यांनी २० मार्च २०१० रोजी तक्रार दाखल केली होतीत्यानुसार पुढे चौकशी प्रारंभ होऊनही त्याला गती मिळत नव्हतीकारण यात २० वर्षांतील २२ जिल्हाधिकारीतहसिलदारअनेक लोकप्रतिनिधी सहभागी होतेया दोषींवर कारवाई व्हावी म्हणून हिंदु जनजागृती समितीने राज्यभर जनआंदोलने केलीतसेच हा तपास जलदगतीने आणि न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली व्हावा म्हणून हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी तथा अधिवक्ता उमेश भडगांवकर यांच्या मार्फत वर्ष २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका (क्र९६/२०१५दाखल केली होतीया याचिकेचा परिणाम म्हणून पोलीस उपमहासंचालकांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश देण्यात आलेत्यावर पोलीस उपमहासंचालकांना न्यायालयात उपस्थित राहून तीन महिन्यात तपास पूर्ण करून चौकशी अहवाल सादर करतो असे न्यायालयात सांगावे लागलेतसे प्रतिज्ञापत्रही त्यांना न्यायालयात सादर करावे लागलेत्यानुसार वर्ष २०१७ मध्ये चौकशी अहवाल न्यायालय आणि शासन यांना सादर झालामात्र शासनाने तो अहवाल विधीमंडळात वा बाहेर सार्वजनिक न करता दडवून ठेवला होतातसेच प्रत्यक्षात दोषींवर कोणतीही कारवाई झाली नव्हतीया संदर्भात पुन्हा याचिका दाखल केल्यावर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर्.डीधनुका आणि न्यायमूर्ती एस्.जीमेहरे यांनी २२ एप्रिल २०२२ या दिवशी सदर अहवालाची प्रत समितीला उपलब्ध करून देण्याचे आदेश शासनाला दिले

मामुख्यमंत्रीतसेच गृहमंत्री यांची भेट घेऊन दोषींवर त्वरित कारवाईची मागणी करणार !

        या अहवालात दोषी ठरवलेल्या आरोपींपैकी मंदिराचा धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याच्यावर श्री तुळजाभवानी मंदिरातील ३५ तोळे सोनेतसेच ७१ किलो चांदी आणि ७१ प्राचीन नाणी गायब केल्याचाही गुन्हा सप्टेंबर २०२० मध्ये नोंद झाला होतात्या प्रकरणात तो फरार झाला होतामात्र पोलिसांनी त्याला २० सप्टेंबर २०२१ या दिवशी अटक केलीया एका आरोपीला वगळता चौकशी अहवालात दोषी ठरवलेले राजकीय नेते तथा वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्या विरोधात कोणतीही कारवाई आजपर्यंत झालेली नाहीत्यामुळे हिंदु जनजागृती समिती राज्याचे मामुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांची भेट घेऊन देवधनाची लूट करणार्‍यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहेया प्रकरणात शासनाने त्वरित कारवाई न केल्यास मान्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याच्या संदर्भात पुन्हा न्यायालयात याचिका करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

        
श्री. सुनील घनवट,
महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक,
हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : ७०२०३ ८३२६४

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी