लोहा| लोहा शहरात सांधे दुखी, मान पाठ कंबर दुखी, संधी वात मणक्याचे आजार यासह अन्य हाडाचे आजार हर्निया असा आजाराची मोफत तपासणी व शिबिराचे आयोजन प्रसिद्ध सांधे प्रत्यारोपण अस्थिरोग तज्ज्ञ डॉ अभिजित शिंदे यांच्या पुढाकाराने रविवारी(२२मे) रोजी लोह्यात होत आहे.
लोहा शहरात वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर अलीकडच्या या काळात आले आहेत .हाडाचे तज्ज्ञ डॉ अभिजित शिंदे यांच्या मुळे लोहा कंधार पालम या भागातील रुग्णाची सोय झाली आहे लोह्यात हाडाच्या गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ शिंदे हे यशस्वीपणे करीत आहेत.
रविवारी 22 मे रोजी शिवकल्याण नगर येथे सकाळी दहा ते सांयकाळी चार वाजे पर्यन्त डॉ अभिजीत शिंदे , पोटविकार तज्ज्ञ डॉ सागर कोटलवार, व डॉ शिवाजी मंगनाळे हे रुग्णाची मोफत तपासणी करणार आहेत. सांधे दुखी, संधीवात, मान पाठ व कंबर दुखी, मणक्याचे आजार, अँपेडिक्स, हर्निया, मुतखडा स्तनातील व इतर गाठी हाडातील ठिसूळ पणा या व अन्य आजारांची तपासणी केली जाणार आहे या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.